Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०
महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे २५ रोजी राज्यभर धरणे
प्रतिनिधी:महाआघाडी सरकारच्या कारभाराविरोधात जनजागृती करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल,असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी सांगितले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मा. पाटील बोलत होते. प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या, प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, सह मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , प्रवक्ते गणेश हाके , विश्वास पाठक आदी या प्रसंगी उपस्थित होते.
मा. पाटील यांनी या वेळी राज्य परिषदेच्या अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली. या परिषदेत राज्य सरकारच्या विरोधात २२ फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र २२ फेब्रुवारी रोजी चौथा शनिवार असल्याने आंदोलन कार्यक्रम २५ रोजी करण्याचे ठरविण्यात आल्याचे मा. पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. महाआघाडी सरकार विसंवादाने कोसळेल, हे सरकार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करणार नाही. हे सरकार कोसळले तर भाजपा सरकार स्थापण्याचा प्रयत्न करणार नाही, असेही मा. पाटील यांनी स्पष्ट केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक प्रतिनिधी :- कथित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने महत्त्वाची कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाध...
-
संतोष खाबिया संभाजीनगर प्रतिनिधी :- १२ तासाच्या आत ०३ आरोपी व महिंद्रा थार कारसह पोलीसांनी आरोपींच्या आवळल्या मुसक्या दिनांक- २०/०७/२०२६ रोज...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा