Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०२०

हमे तो अपनों ने ही लुटा गैरो में कहा दम था।।... श्री अर्जुनभोई मुंबई_



प्रतिनिधी:मी भोई, मी कहारभोई, मी झिंगाभोई, मी परदेशीभोई, मी राजभोई, मी कहारगोडीया, मी किरात, मी मछुआ, मी मांझी, मी जतिआ, मी केवट, मी ढीवर, मी धीवर, मी धीमर, मी पालेवार, मी मच्छिंद्र, मी नावाडीभोई, मी मल्हार, मी मल्हाव, मी मल्लाव, मी बोई, मी नावाडी, मी नावाडीतारु, मी खाडीभोई, मी गाढवभोई, मी खारेभोई, मी ढेवरा, मी भनारा-भनारी-भनारे, मी निषाद, मी मल्लाव, मी मल्हारभोई, मी नाविकभोई, मी ओडेवार, मी ओडेलु मी बेस्तार-बेस्ता... या आपआपल्या जमातीचं काय घेउन बसलात राव...अहो, आपण महाराष्ट्र शासनदरबारी ज्या जमातीमध्ये अंकीत आहोत ना...!!! त्यातुनच आपले अधिकार एकञ होऊन तर लढु या ना... आमच्याही समाज जमातीघटकाचा किंबहुना आमचाही दबदबा राज्यपातळीवर इतर जाती जमातीसमोर ठेवून कार्य करु या ना... बाराबलुतेदार आणि अठरा अलुतेदार हा राज्यातील महत्त्वपुर्णघटक जो भारतीय जीवन प्रणालीत कार्य करतांना दिसत होता.

पारंपरिक मच्छीमारी करतो तो भोई तत्सम,
कपडे शिवणारा शिंपी,तेल काढणारा तेली,
केस कापणारा न्हावी लाकुड़ तोडणारा सुतार दूध टाकणारा गवळी
पुजा-अर्चा, पौरोहित्य करणारा ब्राह्मण
भाजीपाला-वृक्ष लावणारा माळी
आणि लढाई लढणारा क्षत्रिय... इत्यादी इत्यादी
आपले कामच म्हणजे आपली जात जमात आता आपण भोई तत्सम जमातीघटक असाल तर मी मी मीपणा करुन त्यासाठी भांडत बसण्यापेक्षा जातीजातीत, जमाती जमातीत एकरुपतेचा नारा देऊन काही तरी बदल राज्यात करुन दाखऊ या ना... बदला की राव ... केव्हाचं तेच तेच मी पणाचं धरुन बसला आहात...समाज बांधवांनो,
आपण आपल्या जमाती जमातीघटकांनी आणि आपल्या एकोप्याने मोठं राज्यात होऊ या ना... फक्त एकला चलोरेच्या वाटेने न्हाय... आपण ज्या जातीजमातीत जन्माला आला, हा काय आमचा कमीपणा आहे का? नाही... कदापि नाही...आणि तो होऊ शकत नाही हा तर आमचा, आमच्या पूर्वजांचा पराक्रमच व्हय ना? मग कशाला मी मी मीपणाचा उगीचच बोभाटा करता राव ? काहींना आता काम नाही तर ते आपल्या हक्काच्या माध्यमातून तयार करू या, सगळ्यांना शिक्षाण हाय पण शिकायचं कामं करायचे, आपल्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांचा विकास करायचा की... हे नुसते मी मी मीपणाचे उद्योग करायचे....? समाजपटलावर एकतेची नविन विचारधारा घेऊन जाऊ या... पटत असेल तर नक्की शेअर करा नाही तर सोडून देण्यातच धन्यता माना._


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध