Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०
Home
/
Unlabelled
/
मा श्री अर्जुनभोई, मुंबई तरुण-गर्जना न्युज पेपर या वृत्तपत्राला कार्यकारी संपादक पदी नियुक्ती ..
मा श्री अर्जुनभोई, मुंबई तरुण-गर्जना न्युज पेपर या वृत्तपत्राला कार्यकारी संपादक पदी नियुक्ती ..
राज्यातील प्रत्येक समाजाला न्याय मिळावा समाजात समाज हक्कापरिचे विचार तरुणांपर्यंत पोहोचावेत आणि कोठे तरी समाजहक्का विषयीचे वातावरण हे संपूर्ण राज्यात निर्माण व्हावे ही मनिषा सदैव मनात ठेऊन समाजसेवेची कृतीतील धडपड ठेवणारे मा श्री अर्जुनभोई यांची तरुण गर्जना न्युज पेपर या वृत्तपत्राला कार्यकारी संपादकपदी नियुत्ति करीत आहोत. मा श्री अर्जुनभोई यांनी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेर ही सामाजिक एकतेचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले आहे आणि आजही ते करत आहेत. भारतीय सामाजिकपातळीवर त्यांच्या समाजघटकातील समाजसेवेच्या कार्याची आम्हाला प्रचिती ही आहे. आज पर्यंत त्यांना त्यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून भोई समाजभुषण महाराष्ट्र, समाजगौरव,राज्यस्तरीय आदर्श गुणवंतशिक्षक,भोईगौरव, समाजसाथी, समाजमिञ, बारा बलुतेदार व अठराअलुतेदार भुषण महाराष्ट्र अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजही ते घुमंतु जाती जनजाती विकास परिषद, मुंबई महाराष्ट्राचे राज्य उपाध्यक्ष, मच्छीमार संघर्ष कृती समिती, मुंबई महाराष्ट्राचे सचिव, आहेत. राज्यातील विविध सामाजिक संस्था, दलं, संघ, महासंघ, संघटना, विचारमंच यांच्या प्रमुखांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहे. आजही ते अनेक पदांवर कार्यरत आहेत. विविध क्षेत्रातील कार्यरत आणि सन्मानित श्री अर्जुनभोई मुंबई यांची तरुण-गर्जना न्युज पेपर या वृत्तपत्राला कार्यकारी संपादकपदी निवड करतांना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री अर्जुनभोई म्हणाले की, राज्यातील तमाम समाज घटकांच्या घराघरात एकतेचा नारा देणारे तरुण-गर्जना न्युज पेपर या वृत्तपत्राला युवा शक्तीचा बुलंद आवाज पोहोचविण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील घटक प्रयत्नरत राहणार आहोत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...


दिनेश वाडीले
उत्तर द्याहटवा