Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

देशभरातील भटक्या विमुक्तांना CAA अाणि NRC कायद्याबद्दल किंचतही भिती बाळगण्याचे कारण नाही-कर्मवीर दादा इदाते.




   
मुंबई(२३फेब्रुवारी,२०२०:
देशभरातील भटक्या-विमुक्त जाती जमातीसाठी कार्य करीत असलेल्या विमुक्त घुमन्तु  जनजाती विकास परिषद(अखिल भारतीय) या संघटनेच्या मुंबई विभागाच्या वतिने "विमुक्त भटक्या जाती जमातीसाठी कार्य करणार्‍या मुंबई विभागातील कार्यकर्त्यांचे संमेलन तथा CAA ,NRC व NPR बाबत विमुक्त भटक्या समाज कार्यकर्त्यांमध्ये असलेला संभ्रम" या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम  रविवार दिनांक २३ फेब्रुवारी,२०२० रोजी सकाळी ९:३० ते दुपारी १:०० वा. या वेळेत संघटनेचे केंद्रिय कार्यालय,स्व.शैलजा विजय गिरकर समरसता सभागृह,राजर्षी शाहु महाराज संस्कार केंद्र,फुलपाखरु उद्यान,मागाठाणे डेपो समोर,बोरीवली(पुर्व), मुंबई-४०००६६ या ठिकाणी अायोजित करण्यात अाला होता.

या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विमुक्त घुमंतू अर्धघुमंतू जनजाती विकास व कल्याण बोर्ड,सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय,भारत सरकार चे अध्यक्ष कर्मवीर भिकू रामजी इदाते(दादा) उपस्थित होते.याप्रसंगी त्यांनी वरिल उद्गार काढले.गेली ५० वर्षे मी या विषयावर काम करित असून मला या विषयातील सर्व खाचगळगे माहीत अाहेत. मुळात भटका विमुक्त समाज अस्थिर राहीलेला अाहे अाणि अत्यंत भावनिक,देशप्रेमी  व संस्कृतीचे जतन अाणि रक्षण करणारा समाज अाहे.ज्या लोकांनी राज्यात अाणि केंद्रात एवढे वर्षे  सत्ता भोगली त्यांनी कधिही या समाजाच्या कल्याणासाठी काहीही केले नाही.जर त्यांनी या समाजाचा विकास केला असता अाणि मुख्य प्रवाहात अाणले असते तर अाज हि वेळ अामच्या समाजावर अाली नसती.अाज तेच लोक भटके विमुक्त समाजामध्ये  मुद्दाम संभ्रम निर्माण करित अाहेत.माझा त्यांना प्रश्न अाहे जर तुमच्या प्रदिर्घ सत्तेच्या काळात तुम्ही या समाजाकडे लक्ष दिले असते तर हे बोलण्याची तुमच्यावर वेळ अाली असती का?. 

सध्या देशातील विविध विचारसरणी संपत अालेल्या अाहेत.त्यांनी राजकिय लाभासाठी वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवलेले प्रश्न अाज निकाली निघत अाहेत.उदा.कलम ३७०,३५ अ,राम मंदिर,ट्रिपल तलाक,CAA इ. हे सर्व होत असताना देशात काहीही अनुचित प्रकार घडत नव्हता त्यामुळे या विघातक शक्तिने CAA, NRC अाणि NPR  या कायद्याच्या नावाखाली देशात अशांततेचे वातावरण निर्माण केले 

अाहे.राज्यात मध्ये भटके विमुक्तांचे वेगळे मंत्रालय १९९९ मध्ये निर्माण केले होते.या समाजाला मुख्य प्रवाहात अाणण्याचे काम सुरु झाले होते.परंतू १५ वर्षे  ज्या मंडळीने हे मंत्रालय व विभाग बंद करुण ठेवले होते तेच अाज अाज भटके विमुक्तांमध्ये अस्थिरता निर्माण करित अाहेत.पुन्हा भटके विमुक्त व ओबीसी मंत्रालय व विभाग २०१५ मध्ये सुरु केला होता परंतू काही दिवसापुर्वी त्याचे नाव बदलण्यात अाले असल्याचे समजले अाहे. या लोकांचा यासमाजाविषयी किती द्वेष अाहे हे अापण ओळखले पाहीजे अाणि सावध झाले पाहीजे.जे लोक स्वत:ला भटके विमुक्तांचे नेते म्हणवून घेतात अाणि समाजात या देशहिताच्या कायद्यासाठी संभ्रम निर्माण करित अाहेत ते मंत्रालय व विभागाच्या नावासाठी का बोलताना दिसत नाहीत?.१५ वर्षे मंत्रालय बंद होते ती मंडळी का गप्प होती? भटका विमुक्त समाज हा  देशाचा अाद्यक्रांतिकारक अाणि संस्कृती रक्षक समाज अाहे.अापली ओळख ही या देशाची संस्कृती अाहे अाणि ती अापल्या नसानसात पिढ्यांपिढ्या वहन करित अाहे. 

या देशातील एकाही भटक्या विमुक्ताला या कायद्यापासून कसलाही धोका नाही.एकाही व्यक्तीचे यात कसलेही नुकसान नाही तसेच अापल्या मनात किंचितही भीती बाळगण्याचे कारण नाही असे त्यांनी सांगितले.कोणतीही अडचण येणार नाही.यदाकदाचित काही अडचण अालीच तर मी अाणि सरकारचे बोर्ड त्यासाठी सक्षम अाहोत. त्यामुळे अशा संभ्रमित करणार्‍या मंडळीपासून सावध व्हा अाणि समाजामध्ये जनजागृती करा असे श्री.दादा इदाते यांनी सर्वाना अावाहन केले.
याप्रसंगी CAA,NRC  अाणी NPR या कायद्याच्या समर्थनार्थ ठराव मांडण्यात अाला अाणि सर्वानी त्याला हात वर करुण समर्थन दिले.

या कार्यक्रमासाठी ना.मा.श्री.विजय (भाई) गिरकर,माजी राज्यमंत्री तथा उपनेते,विधान परिषद,महाराष्ट्र शासन यांची उपस्थिती होती.त्यांनी सुध्दा अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच अॅड.जे.पी.मिश्रा यांनी CAA कायद्याविषयी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले.त्यांनी लिहलेल्या CAA विषयी मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात अाले.

या वेळी सरोदे समाज उन्नती मंडळाच्या वतिने तयार केलेल्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात अाहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून खा.मा.श्री.गोपाळजी शेट्टी (खासदार,उत्तर मुंबई),मा.श्री.गणेशजी खणकर (नगरसेवक,बृ.मु.म.न.पा.),मा.अॅड.जे.पी.मिश्रा जी(अध्यक्ष,जनसेवा बँक),मा.श्री.अनिल फड(राष्ट्रीय कार्यवाह,अखिल भारतीय विमुक्त घुमंतू जनजाती विकास परिषद),सौ.कांचनताई खाडे(राष्ट्रीय उपाध्यक्ष),श्री.राजेंद्रजी भोसले (राज्य कार्यवाह),श्री.सहदेव रसाळ (मुंबई अध्यक्ष),श्री.तुषारजी पोटे(राज्य कार्यकारिणी सदस्य),श्री.श्रीकुमारजी शिंदे(मुंबई विभाग खजिनदार),श्री.गिरिधर साळूंके(मुंबई कार्यवाह),यांच्यासहित यशवंत वैदू,कमलाकर कोलपटे,मंगेश शिंगे,दत्तात्रय महाजन,अर्चना लष्कर,अॅड.सीमा बीठाणे,अनिल चौगुले तसेच भोई तत्सम जमातीतील सामाजिक कार्यकर्ते आणि परिषदेचे सदस्य संतोषजी मोरे-भोई उल्हासनगर यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध