Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
लॉकडाऊन दरम्यान खामगांव मधे पकडला 22 हजाराचा गुटखा
खामगांव प्रतिनिधी: देशासह संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना ने थैमान घातले आहे.राज्यातील तरूणांमध्ये गुटख्याचे वाढते व्यसन लक्षात घेता 2012 साली गुटखाबंदी लागू करण्यात आली. यानुसार राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनावर बंदी आली. मात्र बंदी असताना राज्यात अनेक ठिकाणी अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री सुरुच आहे.
तर एकीकडे बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव मधे लॉकडाउनचा फायदा घेत गुटखा विक्री जोरात सुरु आहे.
विशेष म्हणजे राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या जिल्ह्यात गुटखा विक्री सुरु आहे. डॉ शिंगणे यांनी पदभार घेताच जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे मारले होते व गुटखा माफ़ियांवर याचा वचक सुद्धा बसला होता. मात्र ही वचक काही दिवसापूर्ती च होती असे आज झालेल्या कारवाई वरून दिसुन येत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर हे गुटखा माफियांसाठी होमटाऊन म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे.
या पार्श्वभूमीवर दिनांक २९ मार्च रोजी खामगांव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथकातिल सुधाकर थोरात, रविंद्र कन्नर, देवेंद्र शेळके, प्रदीप मोठे हे आठवड़ी बाजारामधील रोड वर पायी पेट्रोलिंग करत असतांना भारत प्लास्टिक च्या मागील बाजूस नरेश नागवानी हे गुटखा विक्री करतांना दिसुन आले.ह्यावेळी पथकाने नागवानी ह्यांना 22 हजार 192 रूपयाच्या मालासह ताब्यात घेऊन अन्न व प्रशासन अधिकारी बुलडाणा यांच्या समोर हजर राहण्याचे सुचनापत्र देण्यात आले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा