Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
विदर्भात कोरोनाचा पहिला बळी बुलडाण्यात संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरु
विदर्भात कोरोनाचा पहिला बळी बुलडाण्यात संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनाकडून शोध सुरु
बुलडाणा:प्रतिनिधी: कोरोना व्हायरसने आता देशात चांगलेच हातपाय पसरले आहेत.त्यातही राज्यातील परिस्थिती आणखी भयंकर होत चालली आहे.
कारण आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दोनशेच्या जवळ पोहचली असून बुलडाणाकरांसाठी धोकादायक आणि धक्कादायक बातमी समोर आलीय या जिल्ह्यातही एका रुग्णाचं रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या रुग्णाने काल शनिवारी बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयाच्या आयशोलेशन वॉर्डात अखेरचा श्वास घेतला हे विशेष आहे.
मृत कोरोना रुग्ण हा न्यूमोनिया झाला म्ह्णून भरती झाला होता आणि त्याच्यावर उपचार सुरु होते. रुग्णाचा रिपोर्ट पॉझेटीव्ह येताच प्रशासनाने रुग्णाचे नातेवाईकांची तपासणीसाठी त्यांचे घर गाठले असून सर्वाना कोरोनटाईन करण्यात येणार आहे. तर या रुग्णाच्या जे कोणी संपर्कात आले त्यांचाही शोध घेत असून उल्लेखनीय म्हणजे काल या रुग्णाच्या अंत्यविधीमध्ये १०० ते दीडशे च्या जवळपास नागरिक हि उपस्थित होती.
या रुग्णाला बाहेरदेशाची काही हिस्ट्री जरी नसली तरी पॉजिटीव्ह कसा निघाला याचा शोध प्रशासन घेत आहे आणि आता ज्या भागात तो राहत होता त्याठिकाणी सुद्धा सील करण्याचा निर्णय घेणार आहेत.
शिवाय ज्या रुग्णालयात अगोदर भरती होता त्या रुग्णालयाच्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल आणि त्यांना आयसोलेट करण्यात आहेत. बुलडाणा शहर सुद्धा एक्टिव सर्व्हिलन्स मध्ये घेतलेलं आहे तरं बाहेर न निघण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा