Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २ मार्च, २०२०

आदिवासी पावरा समाजाचा सामुहिक विवाह सोहळा शेमल्या ( ता. शिरपूर ) येथे शबरी सेवा समितीतर्फे एक मार्चला 50 जोडप्यांसह प्रतिदाम्पत्यास सोहळयात वधू-वरांना देवमोगरामातेची प्रतिमासह भागवत गीता, कपडे, संसारोपयोगी साहित्य भेट देऊन नवदाम्पत्यास विधीपूर्व आर्शिवाद देऊन विवाह संपन्न झाला.



विजय महाले  प्रतिनिधी उंटावद ता. 1 : आदिवासी पावरा समाजाचा सामुहिक विवाह सोहळा शेमल्या ( ता. शिरपूर ) येथे शबरी सेवा समितीतर्फे एक मार्चला 50 जोडप्यांसह प्रतिदाम्पत्यास सोहळयात वधू-वरांना देवमोगरामातेची प्रतिमासह भागवत गीता, कपडे, संसारोपयोगी साहित्य भेट देऊन नवदाम्पत्यास विधीपूर्व आर्शिवाद देऊन विवाह संपन्न झाला.

केव्हीपी चे खजिनदार आशाताई रंधे, माजी जि. प. सदस्या सिमाताई रंधे, शिक्षण वि. अधिकारी शिरपूर निता सोनवणे, बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार सन्मांणीत सुरेखा गायकवाड, माजी जि. प. सदस्य दत्तू पाडवी, केंद्र प्रमुख किशोर भदाणे, सांगवी पोलीस स्टेशनचे एएसआय डी. टी. बाविस्कर, काॅस्टेबल साळुखे, खैरनार, विजय मोरे, सूर्यकांत गायकवाड, राजू गाणूशेट, उपस्थित होते. 

आशाताई  म्हणाल्या की, सामुहिक विवाह हा सध्या काळाची गरज आहे. विवाह हा प्रत्येकांच्या आयुष्यातील अविस्मरणीय सोहळा असतो, म्हणून प्रत्येकजण तो उपलब्ध साधन-सामुग्रीद्वारा तो भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आर्थिक अडचणीमुळे व परिस्थितीमुळे विवाह होऊ शकत नाही. शबरी सेवा समीती नववधू-वरास आज आई म्हणूंन लाभलेली आहे. एका विवाह समारंभासाठी लाखो रुपये खर्च होतात. 

म्हणून लग्न सोहळा साधे पनाने व्हावे कारण शेतीमधील तुटपुजे उत्पन्न, डोक्यावर कर्जाचा वाढता बोजा आणि बळीराजाच्या डोक्यावरील  मुला-मुलीच्या विवाहाची व शिक्षणांची चिंता दुर व्हावी यासाठी ( डोंबीवली ) येथील शबरी सेवा समीती सरसावली या  समीतीच्या माध्यामातून गरीब शेतकरी व दुर्बल घटक आदिवासी समाजातील मुला-मुलींचा सामुहिक विवाह सोहळासाठी एक सुंदर हिताचेकार्य आपल्याकडून होत आहे. व वधू-वरांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरुण नाचले व आलेल्या पाहुण्यांणा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध