स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांची जुने बसस्टँड भागात धडक कारवाई
अमळनेर (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी जुने बसस्टँड भागात ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबमध्ये छापा टाकला. यावेळी स्पोर्ट्स क्लबच्या नावाने झन्ना मन्ना जुगार खेळताना २० जणांना अटक करून त्यांच्याकडून ९५ हजार ७५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. यामुळे अमळनेर शहरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे यातील बहुतांश जुगारी हे शिरपूर तालुक्यातील आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बापू रोहम ,एपीआय स्वप्नील नाईक ,अनिल देशमुख,विनोद पाटील , जितेंद्र पाटील,सुधाकर अंभोरे,विलास पाटील , रामकृष्ण पाटील, मुरलीधर बारी यांनी जुने बसस्टँड भागात छापा टाकून ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबमध्ये काही लोक पैसे लावून झन्ना मन्ना जुगार खेळताना आढळून आले.
ऍक्टिव्ह स्पोर्ट्स क्लबमध्ये या जुगारीना अटक
क्लबमध्ये बबलू शेख सुपडू (वय २८ रा जोशींपुरा),नाना भास्कर पाटील (वय ४१ झामी चौक),सुधाकर चिंधु माळी (वय ४० रा वरवाडे ता शिरपूर),सागर प्रकाश इंगळे (वय २५ रा मिळचाळ),कैलास सुकलाल धनगर (४५ वरवाडे ता शिरपूर),प्रल्हाद दामोदर भावसार (४० किसमत नगर शिरपूर),शांताराम धापु कोळी (६१ रा वाघाडी शिरपूर),युनूस संमद पटेल( ४० रा वाडी शिरपूर) , संजय रूपंचांद चौधरी (५० रा तांबेपुरा ,अमळनेर),नंदू गणेश चव्हाण (४७ रा मिळचाल),भीमराव हिरामण पाटील (६२ रा पैलाड) ,विलास शामराव महाजन (५७ रा बालाजीपुरा),रहीम शाह सत्तार शाह (३८ रा वाडी ता शिरपूर) ,शांताराम नानु साळुंखे (५७ सुंदरगडी चोपडा),अनिल दिगंबर पाटील (अमळनेर) , नारायण दिगंबर मराठे (रा धुळे),प्रकाश सुदाम (पाटील वाडी शिरपूर) , किरण रामसिंग बहारे( रा तांबेपुरा),नवल बोरसे (रा पैलाड) याना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून एकूण ९५ हजार ७५० रुपये जप्त करून त्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र्र जुगार प्रतिबंधक कायदा ४ व ५ तर भादवी २७८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा