Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २१ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
वादळी वाऱ्यासह गारपीट मुळे "शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस" चे 70 ते 80 लाखांचे नुकसान
वादळी वाऱ्यासह गारपीट मुळे "शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस" चे 70 ते 80 लाखांचे नुकसान
शिरपूर प्रतिनिधी:अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह गारपीट यामुळे गेल्या तीन दिवसापूर्वी आलेल्या अचानक मोठ्या नैसर्गिक संकटामुळे शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द शिवारातील "शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस" चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील अजंदे खुर्द येथे डॉ. संजय सुराणा, तुषार जैन व हाजी सत्तार तेली यांच्या मालकीचे शिरपूर कोल्ड स्टोरेज अँड वेअर हाऊस आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेक प्रकारच्या मालाची साठवणूक करण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे कोल्ड स्टोरेज च्या बिल्डिंगचे फार मोठे नुकसान झाले. तसेच कोल्ड स्टोरेज मध्ये साठवण्यात आलेल्या मालाचे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूण 70 ते 80 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.
शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. येथील नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून तातडीने मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा