Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

जनता संचारबंदीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पत्रकारांना सहाय्य करतील मात्र वार्तांकन करताना पत्रकारांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाशी बोलतांना केलं.



जनता संचारबंदीत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पत्रकारांना सहाय्य करतील मात्र वार्तांकन करताना पत्रकारांनी देखील स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाशी बोलतांना केलं. 

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला रविवारी जनता संचारबंदीचे आवाहन केले आहे, या पार्श्वभूमीवर वार्तांकन करताना पत्रकारांना विविध अडचणींना सामोरं जावं लागतं, या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांची भेट घेऊन सदर जनता संचारबंदी दरम्यान पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना वार्तांकन करताना 

सहाय्य करावे अशी मागणी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित म्हणाले, जनता संचारबंदी चे वार्तांकन करताना पत्रकारांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच आपले वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे ओळखपत्र सोबत ठेवावे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पत्रकारांसोबत असतील असं आश्वासन चिन्मय पंडित यांनी यावेळी दिला, निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पाटील सचिव धनंजय दीक्षित दैनिक देशदूतचे संपादक अनिल चव्हाण एबीपी माझाचे प्रतिनिधी संजय सोनवणे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध