Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

प्रशासनाला कळवा कोणी विरोध केला .तर पुणे,मुंबई वरून येणाऱ्यांना गावात बंदी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात जावु शकता. - डॉ देशमुख, सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव.



शेगांव:प्रतिनिधी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव होऊ नये याकरिता नागरिकांनी स्वच्छता ठेवणे गरजेचे असून तोंडाला मास्क लावावा मास्क उपलब्ध नसेल तर साधा रुमाल  बांधला तरी चालेल तसेच सॅनिटायझरचा वापर करावा किंवा हँडवॉश,साधा साबण चा वापर करावा आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे अशा सूचना वारंवार नागरिकांना देण्यात येत आहेत याचे महत्त्व नागरिकांनी समजून घ्यावे असे आव्हान विविध राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहून नागरिकांनी स्वतःची कुटुंबाची आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी आपला उदरनिर्वाह करण्याकरिता गेलेले नागरिक आपल्या गावाकडे परततांना दिसत आहेत अशावेळी अनेक गावांमध्ये दवंडी देऊन सांगण्यात येत आहे की बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी आधी तपासणी करावी नंतरच गावात प्रवेश करावा काही ग्रामपंचायत स्तरावर तर अशा बाबतचे ठरावही घेण्यात आल्याचे बातम्या पाहावयास मिळत आहेत. मात्र आज शेगाव येथे पुणे मुंबई वरून तरुण मंडळी पोहोचली असता त्यांनी थेट शासकीय रुग्णालय गाठले व डॉक्टरांशी चर्चा केली 

अशावेळी डॉक्टर देशमुख यांनी त्यांना घाबरून जाऊ नये स्वतःची काळजी स्वच्छता ठेवून घ्या असे सांगितले तर तुम्हाला तुमच्या गावांमध्ये कोणी जर प्रवेशबंदी करत असेल तर तसा काही शासन निर्णय जारी झालेला नाही असे असतानाही तुम्हाला प्रवेश बंदी होत असेल तर थेट तुम्ही पोलिसांची संपर्क करू शकता असे स्पष्ट मत डॉक्टर सुनील देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध