Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ मार्च, २०२०

शिरूड येथील ATM चोरी मधील पिकअप व्हॅन आढळली तिखी शिवारातील डोंगराळ भागात बेवारस स्थितीत



धुळे:प्रतिनिधी:शिरूड गावातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या खालील गाळ्यात लाखोंच्या रोकड सह असलेले एटीएम मशीन शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिताफीने साखळीने तोडून एका महेंद्र पिकअप मध्ये टाकून चार चोरट्यांनी ते लंपास केले होते आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास चोरट्यांनी चोरीसाठी वापरलेली पिकअप व्हॅन एम.एच.१८ एए.५९४८. ही तिखी शिवारात जवळील डोंगराळ भागाच्या बाजूला रस्त्यावर  बेवारस स्थितीत आढळून आली. परंतु त्यात एटीएम मशीन नव्हते पोलिसांना ही माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत 

परिसरातील व वाहनांची पाहणी केली त्यात एटीएम मशीन पोलिसांना आढळून आले नाही पिकअप व्हॅन पोलिसांनी ताब्यात घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे चार चोरट्यांचा तपास सुरू आहे काल नाकाबंदी करूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन चोरटे शिताफीने पसार झाले होते त्यानंतर आज फक्त पिकअप व्हॅन पोलिसांना बेवारस स्थितीत मिळाली. एटीएम मशीन व त्यातील लाखोंच्या रोकडचा अद्यापही तपास लागलेला नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध