Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १ मार्च, २०२०

शासनस्तरावर भोई अंकीत जमातींनी एकत्र एल्गार करावा... श्री अर्जुनभोई


राज्यात शासनस्तरावर भोई अंकीत म्हणून कहारभोई झिंगाभोई परदेशीभोई राजभोई कहारगोडीया किरात मछुआ मांझी जतिआ केवट ढीवर धीवर धीमर पालेवार मच्छिंद्र नावाडीभोई मल्हार मल्हाव मल्लाव बोई नावाडी नावाडीतारु खाडीभोई गाढवभोई खारेभोई ढेवरा भनारा-भनारी-भनारे निषाद मल्ला मल्हारभोई नाविकभोई ओडेवार ओडेलु बेस्तार-बेस्ता या जमाती आहेत. 

आज पर्यंत आम्ही एकल प्रकारात शासनस्तरावर गेलो आहोत परंतु आमच्या हक्कमांगणीचे प्रकार चीरडले गेलेत. मोर्चे, आंदोलने, आक्रोश, आवाज यांच्याकडे वरिष्ठपातळीवुन कानाडोळा हा केला आहे कारण तो आमचा एकल प्रकार होता. राज्यातील वरिल सर्वांना विश्वासात घेऊन जाहीर आवाहन करु या की, राज्यातील शासनस्तरावर भोई अंकीत जमातीघटक हा सर्व एकत्र येऊन सरकारला आपल्या हक्काची मांगणी करावी त्यातुन आपण आपल्या कित्येक पिढ्यांच कल्याण करु किंबहुना आपले कल्याणच होईल. आपण एकत्र येण्याऐवजी आपल्या जमाती जमातीत गटबाजी, राजकारण, ओढाताणी यातच आपला, आपल्या समाजाचा वेळ, पैसा, श्रम, विश्वास खर्च करतोय. 

समाजासमोर आज कित्येक समस्या उभ्या आहेत. बेरोजगारी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा, सरकारी योजना... इत्यादी इत्यादी त्या आपण कशा सोडवणार? सर्व समाज बांधवांना विनंती आहे की, महाराष्ट्र सरकारच्या दरबारी भटक्या जमातीघटक म्हणून आम्ही ज्या भोई जमातीघटक अंतर्गत अंकित आहोत त्यांनी एक व्हा आणि ते ही फक्त आपल्या समाजाच्या हितासाठीच... जर समाजसेवेसाठी आम्ही अनेक संघटनांचे स्वत:चे अस्तित्व अबाधित ठेऊन गटागटाने एक होऊन(भोईसमाज) म्हणून एकत्र येण्याचा किंबहुना समाज एकञीकरणाचा जो प्रयत्न करत आहोत तो महाराष्ट्रातील या संपूर्णभोई जमाती घटकासाठी, त्यांच्या हक्क मांगणीसाठी फक्त राज्यातील भोईसमाज म्हणून (तुमचे अस्तित्व कायम ठेऊन) एकत्र तरी येऊ या ना बघा... जो समाज आपल्या हितासाठी झटतो, काम करतो, एकमेकांना मदत करतो अशा समाजाची दखल नेहमी इतर समाज, शासनस्तरावर घेतली जाते सर्वांना विनंती आहे की, राज्यातील भोईजमाती घटकाच्या एकीकरणासाठी अर्थात शासनदरबारी भोईसमाजासाठी एकत्रित होऊन आपले सामाजिक हक्काचे कार्य करु या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध