Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १० मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
विसरवाडी व तळोदा येथील बनावट ताडी विक्री केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड
विसरवाडी व तळोदा येथील बनावट ताडी विक्री केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड
नंदुरबार (प्रतिनिधी) विसरवाडी व तळोदा येथील बनावट ताडी विक्री केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकली असून, तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाडसत्रात १ लाख २३ हजारांच्या मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने नंदुरबार-तळोदा रस्त्यावरील वाकाचार रस्त्यावर ताडी वाहतूक करताना एक मोटरसायकल स्वाराला पकडण्यात आले.त्यानंतर भरारी पथकाने अधिक चौकशी केली असता विसरवाडी ता. नवापूर व तळोदा येथे बनावट ताडी विक्री केंद्रावर धाडी टाकण्यात आल्या.
धडासत्रात ताडी बनवण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल साहित्य जप्त करून १ हजार २५० लिटर बनावट ताडी नष्ट करण्यात आली.कारवाईत तिघा आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून,१ लाख २३ हजार १७० रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन मोहोळ, जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अ.द देशमाने, मनोज संबोधी यांच्या पथकाने केली. पुढील तपास मनोज संबोधी करीत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा