Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० मार्च, २०२०

नंदुरबारात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने प्रचंड खळबळ;जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू,रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविणार


नंदुरबार (प्रतिनिधी) सर्वत्र कोरोना जीव घेण्या व्हायरसने दहशत निर्माण केली असताना आज मंगळवारी नंदुरबार शहरात संशयित रुग्ण आढळून आल्याने प्रचंड खळबळ उडालेली आहे. संशयित रुग्णावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून,त्याचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
कोरोना व्हायरसचा चीनमध्ये कहर पाहायला मिळत आहे. कोरोना व्हायरसमुळे चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. या भयंकर अशा कोरोना व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळले आहेत.चीनमध्ये पसरलेल्या भीषण कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण मुंबई, पुण्यात आढळून आल्याने खळबळ माजलेली असताना आज रविवारी नंदुरबार शहरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणावर भीतीचेेेे वातावरण निर्माण झाले आहे.

नंदुरबारातील नागरिक परदेशात गेला होता. परदेशातून परत शहरात आल्यानंतर त्यास सर्दी व खोकल्याचा त्रास होऊ लागला. त्यानंतर संबंधित व्यक्ती खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेला असता त्यास जिल्हा रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला देण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर संबंधित रुग्णाची रक्त तपासणी करण्यात आली असून, नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दरम्यान रुग्णाचे नाव कळू शकले नाही.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये

जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे.सर्दी,खोकला असल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आहेेेत.नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

नागरिकांमध्ये दहशत

कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाज माध्यमांतुन वृत्त धडकल्यानंतर खडबड उडाली. अनेक नागरिकांनी आपल्या कौटुंबिक डॉक्टरांकडे आजारासंबंधी विचारपूस करायला सुरुवात केली.

माक्स खरेदीसाठी मेडीकल दुकानांवर गर्दी

जास्त खोकला हे कोरोना व्हायरस संक्रमणाचे लक्षण असू शकते.घसा खवखवणे.या संसर्गामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तीचा घसा नेहमी खवखवतो कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ताप येणे हे या संसर्गाचे प्रारंभिक लक्षण आहे. अस्वस्थता: कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे शरीरात अस्वस्थता जाणवते. त्याला काय होता आहे हे स्वतःला कळत नाही. आजारी असल्याचे आढळून येते. या विषाणूचा श्वसन प्रणालीवर परिणाम होतो ज्यामुळे शिंका येणे हे या त्रासाची लक्षणे आहे. त्यामुळे माक्स खरेदीसाठी शहरातील अनेक मेडिकल दुकानांवर  गर्दी पाहायला मिळत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध