Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ मार्च, २०२०

रावेर:तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी वाहन धारक करीत आहेत.



रावेर:प्रतिनिधी:तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी वाहन धारक करीत आहेत. खिर्डी ते बलवाडी या सुमारे चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी 

खिर्डीकडून सुमारे एक किलोमीटर रस्ता नुकताच नव्याने तयार झाला आहे मात्र तो आता पासून उखडायला सुरुवात झाली आहे.त्यापुढील एक किलोमीटर रस्त्याची तर फारच दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे. 

खड्डे चुकवत चुकवत वाहन चालवताना अनेकदा छोटे मोठे अपघात होतात.तेथून पुढील बलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही सुमारे सहा महिन्यापूर्वी झाले मात्र ते ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे.या रस्त्याचे तातडीने काम करावे अशी वाहनधारकांची मागणी आहे.
फोटो- खिर्डी- बलवाडी या रस्त्याच्या उखडलेल्या भागाचे  छायाचित्र



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध