Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

कोरोना ( चारोळी ) वेळोवेळी स्वच्छ धुवा हात नाहीतर होईल घात विषाणु पाहत नाही जातपात घरात बसा दिनरात....



परंपरा जीवनशैली शास्र आणि दंतकथा   
लेखक :- प्रदीप मनोहर पाटील.. 
आज सहज मनात आलं बाहेर पडता येतं नाही म्हणुन. पुरातन काळापासून आपल्या बऱ्याच रूढी  या शास्त्रीय कारण धरून होत्या काही चुकीच्या अंधश्रद्धा होत्या त्या काही लोकांनी पसरवलेल्या अफवा असंच म्हणावं लागेल. परंपरा  घरा पासुन लिहण्यास सुरवात करतोय. पुर्वी अशीं शिकवण आणि म्हण नियमित आजोबा आम्हाला सांगत "लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान संम्पत्ती आरोग्य लाभे".  

त्याच कारण असं वाटतं पहाट वेळी आल्हाद हवा शांत ओझोन वायूने भरलेली असते शुद्ध हवा माणसाचं आरोग्य छान ठेवण्यासाठी मद्त करते. लवकर उठून सर्व विधी देव नामस्मरण देवपूजा याने सद्विचार अंगी येतात. राष्ट्रगीत सर्वधर्म प्रार्थना केली तरी छान.  तसं म्हणूनच देशप्रेम रुजावे सद्भावना यावी दिवसाची सुरवात चांगली व्हावी  म्हणुन शाळेत गेल्या बरोबर प्रार्थना होते कारण हेच सद्विचार वातावरण निर्मिती.  सकाळी लवकर उठलो सर्व जीव जेव्हा उठतात तेव्हा आपण पण उठावे पहाटवेळी कोंबडा आरवायचा  सारी पशुपक्षी यांच उठणं किलकिलाट त्याच बरोबर माणसाने उठलं पाहिजे  सृष्टी सोबत असंच कारण असं वाटतं सारे जीव उठले आपण झोपलेलो असलो तर झोपेत असतांना जी सुष्म जीव उठलेत त्यांना आपल्या शरीरात शिरकाव करण्यास वाव मिळुन  निवारा आसरा मिळु शकतो असं असु शकतं कदाचित.  नंन्तर सुरु होतं साऱ्यांचा जीवनक्रम  दिवसभर वातावरण ढवळून काढणं  इकडून तिकडे येजा फिरणं  हवा दूषित होणं सारी सुष्म जीव यांचं पण फिरणं संद्याकाळी जास्त प्रमाणात वातावरण खराब असतं म्हणुन दिवे लागणी वेळी घरात असणं. लवकर जेवण करून लवकर झोपणं हवेतील पसरलेली सुष्म जिवाणू विषाणु जीव खाली बसतात तेव्हा आपण घरात असणं असंच असलं पाहिजे कदाचित.. पुर्वी घरातील  माणुस बाहेरून आला बाहेरच  हातपाय धुण्या पाणी ठेवलेल असायचे मग घरात यायचं.. 

कोणीही नातेवाईक आलेत तरी अगोदर हातपाय धुवूनच घरात  येतं..तसं आता पण होऊ शकतं बघा बिल्डिंग गेट जवळ एक नळ ठेवला बाहेरच स्वच्छ धूलिकण साफ करून घरी जाता येईल सर्वानी अंगीकार केला पाहिजे पण.जेवतांना  वेगवेगळ्या ताटात त्यास पाण्याने ओवाळून सुष्म जीव अन्नात जाऊ नये. अश्या अनेक छोटया छोटया आरोग्य काळजी  जी जीवनशैली होती.  

अंत यात्रेला गेले सोबत रुमाल असायचाच अंतयात्रा घरा समोरून गेली मागे थोडं पाणी फेकणं.   शेवटी  तर नदीत पाणी असेल तर तेथे अंघोळ करणं कपडे पण ओले करून धुणं. किंवा घरी बाहेरच हातपाय धुवून घरात प्रवेश करून अंघोळ करून सर्व वस्र धुणं त्या मृत  वेक्तीच्या अंगावरील किटाणू संसर्ग टाळणं असंच.  लहानलहान गोष्टी आहेत बऱ्याच जुन्या जाणकारांना आपणास  माहिती आहेत म्हणुन काही सांगत नाही. 

एक प्रसंग सांगतो मी लहान होतो माझ्या बरोबर माझ्या बरोबरची दोन तीन मुलं आम्ही एका खोलीत खेळत असतांना दुपारची वेळ ऊन कडक म्हणुन वरून छता वरून झरोक्यातून उन्हाची तिरीप येतं होती त्यात असंख्य  वाटलं धूलिकण येताय मी बाजूच्याला सांगितलं ये हे बघा किती धुळ उडतेय बघा उन्हात दिसतेय तेव्हा एकांन सांगितलं अरे ते बारीक जीव आहेत. 

धूलिकण सोबत अंनत सुष्म जिवाणू विषाणु उडत असतात. त्या वेळी लहानपणी आम्हाला ते समजलं. असंच एकदा खेळता खेळता एका बंद जेथे कामा शिवाय कोणीच जात नसे सामानाच्या खोलीत आम्ही गेलो जिन्यात वरती छताला आम्हाला तीन चार  वटवाघूळ उलट चिपकलेले दिसलें. चुकून आली असली पाहिजेत आम्ही घाबरून जाउन आजोबांना सांगितलं. लगेच त्यांनी माणसाला बोलावून त्यांना मारून बाहेर लांब पुरून येण्यास सांगितलं याचं कारण माणसा पासून ते पण लांब राहात आणि माणुस पण त्यांच्या पासून लांब राहे. 

निर्मनुष्य ठिकाणीचं ते येतं भयावह भ्यासुर गुहेत अंधार जास्त राहतो तेथे आपलं बस्तान बसवत. याचा अर्थ पूर्वीच्या लोकांना ज्ञान असलं पाहिजे वटवाघूळ हे वाईट विषाणु यांच वस्ती ठिकाणं ज्या पासून माणुस मरू शकतो असंच. तसंच घुबड बद्धल दंतकथा सांगितल्या जात तिच्या पासून लांब राहा तिला मारू नका दगड जरी मारला तरी माणुस मरतो ती मारलेला दगड उचलुन दगड उगाळत बसते जसा दगड  उगळतो  तसं तसं माणुस बारीक होत जातो हळूहळू मरतो. हि झाली दंतकथा पण आता समजतेय की घुबड हे सुष्म किटाणू विषाणु यांच भांडारघर. मला वाटतं पुर्वी माणुस उंच  बुद्धिमत्ता असलेले होतं  .  

अजुन एक  सांगतो  घुबड इतकं वाईट अशुभ म्हटलं तरी त्यास काही जण  लक्ष्मी प्राप्त करून देणारी असं म्हटलं जातं हे अनाकलनीय आहे. म्हणजेच त्रास दिला तर मराल नीट  राहिलात तर चांगलं होईल असंच वाटतं.. आपण  चांगल्या गोष्टी काय हे शास्त्रीय दृष्टीने शोधून काय फायदा होतो का शास्रज्ञानी शोधलं बघा काही मिळते का या घुबड गोष्टी पासून शिकायला असंच मनातविचार आला सुचवतोय.   

तश्याचं दंतकथा निर्मिती असली पाहिजे प्रबोधन साठी उद्धेश चांगला पण खोटं लोकांना पटवण्या साठी असं मला वाटतं जसं एक तीळ सात भाऊ यांनी खाल्ली यात एकोपा दाखवला... 

पूर्वीची माणसांची जीवनशैली अप्रतिम होती त्यात शास्र शास्त्रीय कारण होतं असंच 

...यात लिहलेल्या मता बरोबर आपण सहमत असावं असं नाही सुचलं तसं लिहलं वाईट असेल तर सोडावं... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध