Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

जळगावमध्ये कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मेहरूण परिसरातील नागरिकांना महापौरांनी दिला धीर


जळगाव प्रतिनिधी: उद्याच परिसर निर्जंतुकीकरण करणार : नागरिकांनी खबरदारी घेण्याचे महापौरांचे आवाहन !

जळगाव : शहरात कोरोनाचा रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मेहरूण परिसरातील नागरिकांनी थेट नगरसेवकांचे घर गाठून परिसर निर्जंतुकीकरण करण्याची मागणी केली होती. माहिती समजताच महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी लागलीच मेहरूण परिसर गाठला. रात्रीच्या ११ वाजता देखील बाहेर जमाव करून उभे असलेल्या नागरिकांना त्यांनी घरात थांबण्याचे आवाहन केले. महापौरांनी मनपा आयुक्तांना फोन करून आरोग्य विभागाची पूर्ण यंत्रणा उद्या मेहरूण परिसर निर्जंतुक करण्यासाठी पाठविण्याचे सांगितले.

नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी बाळगावी आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे योग्य पालन करावे, असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले. दरम्यान, रुग्णाच्या नातेवाईकांना देखील महापौरांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध