Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
बुलडाणा 'स्वाभिमानी'त शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. संघटनेत जोरदार इनकमिंग..! नव्या दमाने कामाला लागा - रविकांत तुपकर.
बुलडाणा 'स्वाभिमानी'त शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश. संघटनेत जोरदार इनकमिंग..! नव्या दमाने कामाला लागा - रविकांत तुपकर.
बुलडाणा प्रतिनिधी( ता.१५) : शेतक-यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर येऊन आक्रमकपणे लढणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पसंती देत नव्यानेच चालु केलेल्या ‘स्वाभिमानी’च्या बुलडाणा जनसंपर्क कार्यालयात जाऊन शेकडो तरुणांनी ‘स्वाभिमानी’चे राज्याचे नेते मा.रविकांत तुपकर व युवा आघाडी विदर्भप्रमुख प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संघटनेत जाहीर प्रवेश केला आहे.
१४ मार्च रोजी पुर्वनियोजन नसतांना अचानक घाटाखालील संग्रामपुर शेगाव व घाटावरील मेहकर, बुलडाणा तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांनी थेट बुलडाणा गाठत ‘स्वाभिमानी’च्या कार्यालयात पोहचले.
शेतक-यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याकरीता अहोरात्र सज्ज असल्याचे सांगून रविकांत तुपकर यांच्या हस्ते बिल्ले लाऊन संघटनेत प्रवेश निश्चित केला. यावेळी कार्यालयासमोर प्रवेशसोहळा कार्यक्रम पार पडला. उपस्थितांना रविकांतभाऊंनी मार्गदर्शन केले. मा.राजू शेट्टी साहेब व रविकांतभाऊंच्या नेतृत्वात गाव तेथे शाखा व घर तेथे ‘स्वाभिमानी’ पोहचविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
यामध्ये संग्रामपुर व शेगाव तालुक्यातील प्रतिक गावंडे, मोहन धर्माळ, गजानन रावणकर, गजानन ढोले, चंदन कोहरे, विजय मानकर, प्रशांत लहुकार, विकी तराळे, आकाश जाधव, संदीप घिवे, सुरेश खिरोडकार, प्रमोद चोपडे, घनश्याम राठी, शिवलाल चोपडे, शत्रुघ्न चोपडे, दिलीप चोपडे, प्रविन उमाळे, प्रमोद चोपडे, गजानन चोपडे, संजय चोपडे, प्रमोद वडशंकर, राजेश निमकर्डे, सागर निमकर्डे, सुपडा सोनोने, रामभाऊ करांगळे, नयन इंगळे, निलेश पाटील, संजय चितोडे, राजू निमकर्डे, समिर अली, संतोष भारसाकळे तसेच मेहकर तालुक्यातिल प्रशांत साबळे, सुनिल मानवतकर, आकाश जाधव, भारत साबळे, अब्बु मुधळकर, बालाजी टाले, अरुण धांडे, नजिर खॉ पठाण, जमिर खॉ पठाण, ज्ञानू देशमुख, डॉ दिपक देशमुख, विलास देशमुख, शिवाजी औदगे, भागवत देशमुख, छोटु देशमुख, विष्णु धांडे, पवन म्हसने, भागवत टेकाळे, विवेक ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.तसेच बुलडाणा तालुक्यातील आरिफशहा फरीबशहा, युसुफशहा मोबीनशहा, गुड्डू ठेकेदार, शे.जिल्लानी, संदीप पाटील, अंबादास जेउघाले, रमेश मुळे, आदित्य धंदर, अशोक जवरे, शुभम धंदर यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. विविध तालुक्यातील तरुणांनी प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात संघटनेला एक नवी उभारी मिळाली आहे. प्रवेश सोहळावेळी
स्वाभिमानीचे विदर्भ युवा कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन, जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले, अनंता मानकर, अमोल राऊत, मयुर बोर्डे, ज्ञानेश्वर कल्यानकर, नितीन राजपूत, शे.रफिक शे.करीम, पवनकुमार देशमुख, महेंद्र जाधव, दत्ता जेउघाले, आकाश माळोदे, कडूबा मोरे, प्रफुल्ल देशमुख, रोशन देशमुख, विठ्ठल वखारे, गोपाल तायडे, गोपाल भिसे,धनंजय कोरडे, यांच्याहस्ते सर्व कार्यकर्त्यांचे हार घालुन जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा