Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे पत्रकाराच्या अनेक मागण्याबाबत महाराष्ट्र पत्रकार संघ मुख्यमंत्र्याना निवेदन देणार!
जनता कर्फ्यू व लॉकडाऊनमुळे पत्रकाराच्या अनेक मागण्याबाबत महाराष्ट्र पत्रकार संघ मुख्यमंत्र्याना निवेदन देणार!
प्रतिनिधी : राज्यात कोरोना सारख्या महाविषाणूचा फैलाव जोरात सुरु होताच आपण घेतलेल्या लॉकडाऊनचा स्तुत्य निर्णय घेतलात.त्याबद्दल आपले सर्वप्रथम पत्रकार बांधवांच्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन. कोरोनाच्या संकटाचा सामना महाराष्ट्रातील नागरिक करीत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनता कर्फ्यू व लॉकडाऊन सारखे अनेक चांगले मोठे निर्णय घेतले असून अाम्ही आपल्या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.
पोलीस,डॉक्टर व प्रशासकीय यंत्रणेबरोबर पत्रकार,प्रेस फोटोग्राफर बांधवही आपल्या जिवाची पर्वा न करता जनजागृती करीत आहेत.हे काम करीत असताना काही ठिकाणी पत्रकार बंधूंनाही पोलीसांनी मारहाण केली.तेंव्हा ओळखपत्र असणा-या पत्रकारांना पोलीसांनी मारहाण अथवा अडवणूक करु नये अशी मागणी आहे.
तसेच अनेक पत्रकारांना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे खुप अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.तेंव्हा पत्रकार मग तो प्रिंट मिडीयाचा असो किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा असो या सर्वांचा गांभीर्याने विचार करून अन्य घटकांप्रमाने त्यांना आर्थिक मदतीचे पँकेज द्यावे तसेच या कालावधीत पत्रकारांच्या वाहनांना पेट्रोल/डिझेल चा पुरवठा सुरळीतपणे व्हावा अशी महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने नम्र विनंती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना करणेत येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा