Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

कोरोणा मुळे भोईमच्छिमार बांधवांसमोर मोठं संकट... गजानन अनंतवाळ


अहमदपूर-लातुर प्रतिनिधी: भोई समाज मच्छिमार बांधवांसाठी कोरोणामुळे उपासमारीची वेळ आली आहे. भोईसमाज हा गरिब कष्टकरी समाज असुन आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यास रोज मासे पकडण्यासाठी नदी, तलावांवर जावे लागते आणि मासे पकडून ते मार्केटमध्ये विकून मिळालेल्या मिळकतीच्या आधारावर आपले व आपल्या कुटुंबातील सदस्य यांच्या पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागतो पण आता भोई समाजातील लोकांसमोर कोरोणाच्या फैलावामुळे मोठं आव्हान उभं राहीलं आहे. समोर आड मागे विहीर अशी अवस्था सदर मच्छीमार समाजाची झाली आहे. 
या मच्छीमार समाजासमोर जगण्यासाठी दुसरा पर्यायच शिल्लक नाही असे झाले आहे. मच्छीमारी शिवाय दुसरा धंदा अवगत नाही त्यामुळे आपण जगायचं तरी कसं हे मोठं आव्हान भोईसमाज बांधवांसमोर निर्माण झाले आहे. काही विभागात निसर्गाच्या लहरीपणामुळे तलावात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नाही त्यामुळे तलावांचे भरलेले ठेके आणि मच्छीबिज हा मोठा खर्च करून उत्पादन म्हणावे तितके निघाले नाही त्यामुळे जिवन जगताना खुप मोठी तारेवरची कसरत सदर समाजाला करावी लागत आहे. या संकट समयी शासनाने काही तरी मदत करावी किमान पोटाची खळगी भरण्यासाठी तरी मदतीचा हातभार लागला जावा अशी अपेक्षा उराशी बाळगून परिसरातील भोईसमाज जगात आहे.

अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर मच्छीमार व्यावसाईक सहकारी संस्था मर्यादित, अहमदपूर या संस्थेच्या माध्यमातून 152 मच्छीमार सभासद कुटुंब जगत आहेत. संस्था नोंदणी दिनांक 05/12/1964 मध्ये झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील ही पहीली संस्था आहे. उस्मानाबाद जिल्हा लातूरमध्ये असताना सदरची नोंदणी झालेली संस्था असल्यामुळे सदर संस्थेतुन 152कुंटूबाचा उदर निर्वाव्ह चालतो. 

संस्था बंद असल्यामुळे सभासद बांधवांवर उपासमारीची वेळ येऊन समाजघटक खूप मोठ्या संकटात सापडला आहे त्याकामी शासनाने मदत करावी अशी अपेक्षा परिसरातील समाज बाळगून बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध