Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

रावेर कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी बाजार बंदीचा आदेश दिल्यावरही रावेर येथे काही व्यावसायीकांनी आपली दुकाने आठवडे बाजार रस्त्यावर थाटली. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाने बाजार उठवून लावला.



रावेर प्रतिनिधी:शुक्रवारी आठवडे बाजाराचा दिवस असल्याने रावेर येथील बंडू चौक व आठवडे बाजारात बाजार भरत असतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाèयांनी आदेश काढून बाजारास बंदी घातली होती. नगरपालिकेतर्फे तशी दिवंडीही पिटवण्यात आली होती. 

मात्र काही व्यापाèयांनी या आदेशाकडे डोळेझाक करत आपली दुकाने थाटण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यांनी दुप्पट भावाने विक्री ही सुरू केली होती. या दरम्यान ग्राहकांचा व व्यापा-यांचा वाद ही झाला. दरम्यान बाजार भरविला जात असल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक शितल नाईक आपल्या सहका-यांसह बाजारात दाखल झाले. 

नगरपालिका कर्मचा़री ही यावेळी हजर झाले. पोलिसांनी व नगरपालिका कर्मचा-यांनी दुकानदारांना हकलून लावले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी बैठक घेवून सर्व विभागाच्या अधिकाèयांना सूचना केल्या. 

ग्रामीण भागात गाव निहाय समित्या स्थापन करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

 ग्रामपंयातीत स्वातंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करणे, कुणी आजारी असल्यास त्यास वैद्यकीय मार्गदर्शन करणे, गावात फिरून नागरिकांच्या आरोग्या विषयी काळजी घेणे, नागरिकांत कोरोना विषयी जनजागृती करणे, जास्तीत जास्त अंतर ठेवून बोलणे, गर्दीच्या ठिकाणी जावू नये किंवा गर्दी करू नये आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीस तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, गटविकास अधिकारी सोनीया नाकाडे आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध