Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ मार्च, २०२०

रावेर कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक करणा-यां वाहनांना मध्यप्रदेशाकडून प्रवेश नाकारण्यात येत आहे. परिवहन मंडळाची वाहने व प्रवासी वाहतूक करणा-या वाहनांना दि. 31 मार्च पर्यंत प्रवेश बंद क़रण्यात आला आहे.



रावेर प्रतिनिधी:जगभरात थैमान घालणा-या कोरोनाला आळा घालण्यासाठी मध्यप्रदेश शासनाकडून महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या महामार्गावर सार्वजनिक वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेशास बंदी घातली आहे. महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या लोणी, इच्छापूर, भोटा, देडतलाई या मार्गाने महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये

जाणा-या सार्वजनिक वाहतूक करणा-या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.  आजपासून 31 मार्च पर्यंत सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणारी मॅजीक रिक्षा, क्रूझर वाहने बंद आहेत.

रावेर -ब-हाणपूर दरम्यान रावेर आगारातून ४८ बसेस तर मध्यप्रदेशातील ब-हाणपूर आगारातून येणा-या २४ बसेसच्या फे-या बंद करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान रावेर आगारातून रावेर - औरंगाबाद, कल्याण,पुणे, तुळजापूर, धुळे व राज्यशासनाने सर्व शाळा महाविद्यालय, कोचींग क्लासेस यांना सुटी जाहीर केल्याने तालुक्यांतर्गत शालेय बस फेèया रद्द करण्यात आलेल्या असल्याची माहिती आगार प्रमुख एन.टी.बेंडकुळे यांनी दिली. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध