Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२०
नाशिक: कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
नाशिक:प्रतिनिधी:कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे.
कोरोनापासून वाचण्यासाठी वेळोवेळी सॅनिटायझर वापरावे अशी जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे सॅनिटायझरची मागणी ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे त्याचे दरही वाढले आहेत.
अशा परिस्थितीचा गैरफायदा घेणारेही कमी नाहीत. नाशिक शहरातील मोठी उलाढाल असलेल्या गोळे कॉलनीत बनावट सॅनिटायझर आढळून आले आहे, या ठिकाणी भरारी पथकाने छापा मारून लाखो रुपयांचा साठा जप्त केला आहे.
भरारी पथकाने केलेल्या कारवाईत आज दोन ठोक व्यापाऱ्यांकडून जवळपास १ लाख ६ हजार रुपयांचे बनावट सॅनिटायझर जप्त करण्यात आले आहे. संबंधित व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
बनावट सॅनिटायझर विक्रीवर कारवाई केल्यामुळे नाशिकमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे आणि संतापही व्यक्त होत आहे. सॅनिटायझर चढ्या किंमतीत विक्री होत आहेत, तर अनेकठिकाणी कालबाह्य सॅनिटायझरवर प्रिंटेड असलेले स्टीकर चिटकवून सर्रास कालबाह्य विक्री केल्याचे उघडीस येत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक व सह आयुक्त (औषधे)(नाशिक विभाग) व सह नियंत्रक, वैदयमाप शास्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथक नेमण्यात आले असून पथकात औषध निरीक्षक, वैदयकीय अधिकारी नाशिक मनपा, निरीक्षक- वैधन मापन विभाग यांचे प्रत्येकी एक प्रतिनिधी असून संबंधित विक्रेत्यांवर ते कारवाई करत आहेत.
या पथकाकडून आज नाशिक येथे ठोक विक्रेत्यांच्या व किरकोळ विक्रेत्याच्या तपासण्या करण्यात आल्या. या तपासणीत राहल एन्टरप्राईजेस, आशापुरी एजन्सी, या दोन ठोक विक्रेत्यांकडे बनावट सॅनिटायझर असल्याचे तपासणीत आढळून आले.
याद्वारे औषध निरीक्षक स.सा. देशमुख यांनी एकूण रु. 1 लाख 06 हजार 210चा सॅनिटायझरचा साठा जप्त केला आहे. प्रतिबधित करण्यात आलेला साठा हा प्रथमदर्शनी विनापरवाना उत्पादित केला असल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत अधिक चौकशी सुरु आहे व संबंधिताविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे नागरिकांनी सर्व शहानिशा करूनच खरेदी करावी असे आवाहन प्रश्सानाकडून करण्यात येत आहे.
मास्क आणि सॅनिटायझर हे मेडिकल स्टोअर्समधूनच खरेदी करावे असेही आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. नाशिक शहरात अनेक ठिकाणी विना परवानगी मास्क विकले जात असल्याची चर्चा आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्स, टपऱ्या आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानांवर शिरपूर शहर पोलिसांनी आता ...
-
बेटावद प्रतिनिधी :- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद हे गाव लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरीच्या बाजारासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सध्या येथे कैरी बाजारात...
-
अमळनेर-तालुक्यातील खापरखेडा प्र.डा.येथे व शहरातील पैलाड येथे अशा दोन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. खापरखेडा...
-
शिरपूर/ प्रतिनिधी तत्कालीन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्या कार्यकाळात धुळे जिल्ह्यात शालार्थ आयडी घोटाळा झाल्याचे आणि ...
-
अमळनेर : विना परवाना बैलांची कोंबून वाहतूक करणाऱ्या बेटावद येथील इसमाला वाहनासह चोपडा येथील गोरक्षकांनी तालुक्यातील झाडी येथे पकडून दोन बैल...
-
आळे दि. १७ - आळे गावचे नविनियुक्त सरपंच पदी निवड झाल्याबद्दल सखाराम(मुकुंद) भंडलकर यांचा रामोशी समाज बांधव व जय मल्हार क्रांती संघटना महाराष...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या हद्दीत स.नं. ६/१/ब/१/ब मध्ये स्थानिक पातळीवर माजी नगरसेवकाच्या मुलीने खुल्या जागेवर अतिक्रमण क...
-
शिरपूर/ प्रतिनिधी शिक्षण हे पवित्र क्षेत्र ओळखले जाते.परंतु या विभागातील शासकीय अधिकाऱ्यांनी भ्रष्ट मार्गाने धुळे जिल्ह्यात ४५० शालार्थ आयड...
-
नवागत विद्यार्थ्यांचे मिरवणुकीने स्वागत बेटावद शिंदखेडा तालुक्यातील मुडावद येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा, मुडावद येथे आज शाळा शुभारंभ दिन मो...
-
अमळनेर : येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते समाधान एकनाथ मैराळे यांना शनिवारी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात मानद डॉक्टरेड पदवी प्रदान करण...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा