Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून पोषण पंधरवाडा साजरा करण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सक्ती....
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून पोषण पंधरवाडा साजरा करण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सक्ती....
राज्यातील अंगणवाडी केंद्र काही काळ बंद ठेवण्याची महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेची मागणी....
जळगाव :प्रतिनिधी दि. १४ रोजी राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव मा.डॉ. प्रदिप व्यास यांनी कोरोना व्हायरसचा प्रसार राज्यात वाढू नये. म्हणून दि.३१ मार्च पर्यंत शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याबाबत आदेश जारी केल्याचे समजले. दुसरी कडे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दि. ८ मार्चपासून ते २२ मार्च (पोषण पंधरवडा) पर्यंत गाव व अंगणवाडी पातळीवर दैनंदिन सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करून पोषक पंधरवडा साजरा करण्यासाठी सक्ती केली जात आहे.
याचा अर्थ अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांच्या आरोग्याबाबत उदासीनता दिसते. अंगणवाडी लाभार्थ्यांना कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव झाल्यास जबाबदारी कोण घेईल हा खरा प्रश्न आहे.म्हणून शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्याच्या निर्णयासोबतच राज्यातील अंगणवाडी केंद्र बंद ठेवण्याचाही शासनाने तात्काळ निर्णय घेणे गरजेचे आहे. अशी मागणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना पनवेलच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
बैठकीत संघटनेच्या अध्यक्षा मायाताई परमेश्वर, कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, युवराज बैसाणे, उपाध्यक्ष अँड. गजानन थळे, यांच्यासह सुमंत कदम, दत्ता जगताप, एकनाथ ठोंबरे, कुणाल थळे आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा