Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२०

सुमो गाडिचा अपघात ; दोन पोलिस जखमी


बागलाण:प्रतिनिधी: पिंपळनेर नवापूर रत्यावर सुहरी हॉस्पिटलसमोर मोटरसायकलस्वार दांपत्य अचानक समोर आल्याने पोलिसांच्या गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी तीन पलट्या खावून रत्याच्या शेजारी असलेल्या शेतात जाऊन पडली. या अपघातात चालक पोलीस कॉन्स्टेबल दिलीप मोरे हे जखमी झाले आहे.दरम्यान घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्यांना बाहेर काढून ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या अपघातात कुठलेही जिवीतहानी झाली नाही. माञ पोलीसांच्या टाटा सुमो गाडिचे मोठे नुकसान झाले आहे.

नागरिकांच्या माहितीनुसार गाडीत दोन पोलिस कर्मचारी मध्यधुंद अवस्थेत होते.त्यांना ग्रामिण रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार घेऊन अवघ्या १५ मिनिटांत त्यांनी रुग्णालयातुन काढता पाय घेतला. या अपघातुन मोटरसायकलस्वार अहिरराव दांपत्य थोडक्यात बचावले आहे.दरम्यान गावातील उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी पोलिसांना अपघातासबंधी विचारपुस केली असता जखमी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी हुज्जत घातल्याचे उपसरपंच विजय गांगुर्डे यांनी सांगितले. या संदर्भात दोन्ही पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी गांगुर्डे यांनी एस.पी. कार्यालयात केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध