Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२०

घातक अग्निशस्त्रे बाळगणारा गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


मालेगाव:प्रतिनिधी:मालेगावातील अलीकडेच घडलेल्या फायरिंग प्रकरणाचे पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ आरती सिंह यांनी अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणारे व विक्री करणारे इसमांवर सत्वर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मालेगाव शहरातील सोनिया कॉलनी, आयशानगर परिसरात सापळा रचून संशयित नामे हारूण खान आयुब खान, वय 34, रा. सर्व्हे नंबर 68, सोनिया कॉलनी, आयशानगर, मालेगाव यास ताब्यात घेतले असून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पॅन्टला कमरेस 01 गावठी पिस्टल व खिशात 05 जिवंत काडतुसे मिळून आली. सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीररित्या काहीतरी गुन्हा करण्याचे उद्देशाने घातक अग्निशस्त्र कब्जात बाळगतांना मिळून आला असून त्याचे विरुद्ध आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह मॅडम, व अपर पोलीस अधीक्षक श्री संदिप घुगे सो, यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील, सपोनि संदिप दूनगहू, पोहवा वसंत महाले, पोना चेतन संवत्सरकर, देवा गोविंद, राकेश उबाळे, पोकॉ फिरोज पठाण, रतीलाल वाघ यांचे पथकाने कारवाई केली आहे. आगामी काळातही अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांविरुद्ध अशाच प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध