Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
महिला सबलीकरणात आरोग्याचा वाटा मोलाचा ..... महिलादिनानिमित्त विनयनगर येथे आरोग्यजागर सम्पन्न ....
महिला सबलीकरणात आरोग्याचा वाटा मोलाचा ..... महिलादिनानिमित्त विनयनगर येथे आरोग्यजागर सम्पन्न ....
नाशिक:प्रतिनिधी:स्त्री खंबीरपणे उभी राहिली तरच परिवार भक्कम होतो. मात्र स्त्री स्वतः च्या आरोग्याबाबत फारशी जागरूक नसल्याचे चित्र आहे. प्रत्येकीने दैनंदिनीतील किमान ४५ मिनिटे दिली पाहिजेत. निरामय जीवनशैलीत मूत्रपिंडांची भूमिका महत्त्वाची असते" असे प्रतिपादन अपोलो हॉस्पिटलचे मूत्रपिंडविकार तज्ज्ञ डॉ. मोहन पटेल यांनी केले .
तर ,कोरोना विषाणूला घाबरू नका. वैयक्तिक व परिसर स्वच्छता, नियमित तपासणी, अनावश्यक गर्दीपासून दूर राहणे ही त्रिसूत्री तुमचा कोरोनापासून बचाव करेल असा मोलाचा सल्ला हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राजश्री धोंगडे यांनी दिला. महिलादिनाचे औचित्य साधून विनयनगर महिला मंडळ व अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्यजागर कार्यक्रमात या तज्ज्ञ डॉक्टरांची उद्बोधक व्याख्याने झाली .
डॉ. प्रतिभा औंधकर यांनी प्रास्ताविकात आरोग्यजागराचा उद्देश समजावून सांगितला
यानंतर डॉ. दिव्यानी ब्राह्मणे व चमूने उपस्थित महिलांची आरोग्यतपासणी केली. कार्यक्रमाला परिसरातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितरित्या घेणे महिलांच्या सक्षमीकरणा साठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन या सर्व महिलांनी केले . कार्यक्रम यशस्वितेसाठी महिला मंडळाच्या मृणाल जोशी, सौ.कुलकर्णी, सौ. शहारे, सौ. बिरारी, योगेश माघाडे आदी प्रयत्नशील होते.
फोटो : महिला दिनाचे औचित्य साधून विनयनगर महिलामंडळाने आयोजित केलेल्या आरोग्यजागर कार्यक्रमात बोलताना डॉ. मोहन पटेल. समवेत डॉ.राजश्री धोंगडे , डॉ. प्रतिभा औंधकर , डॉ.दिव्यानी ब्राह्मणे, आदी मान्यवर दिसत आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟩 अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांचे हाल होत असून, उष्माघात व आजारामुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटना समो...
-
संदीप अवधूत :- आंबेडकरी चळवळीची बुलंद तोफ, रिपब्लिकन सेनेचे नेते झुंजार पत्रकार सक्षम पोलीस टाइम्सचे उपसंपादक संजय दोंदे यांची आखिल भारतीय ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा