Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
नाराज एकनाथ खडसेंना राज्यसभेची ऑफर ?
जळगाव प्रतिनिधी:राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि माजी राज्यमंत्री फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. आता, भाजपचे ज्येष्ठ व नाराज नेते एकनाथ खडसे यांना राज्यसभेत पाठवले जाणार असल्याच्या चर्चेला वेग आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या कोटय़ातून राज्यसभेवर निवडून गेलेल्या सात खासदारांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळं या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. भाजपनं रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले, माजी खासदार उदयनराजे भोसले यांची नावे आधीच निश्चित केली आहेत.
दरम्यान, तिसऱया नावासाठी संजय काकडे यांचे नाव समोर आले होते. मात्र, आता त्यांचं नाव मागे पडल्याचं दिसत आहे. राज्य भाजप कार्यकारिणीकडून खडसे यांच्या नावाचा आग्रह धरला जात आहे. खडसे तो आग्रह मान्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा