Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ९ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
शेगांव महिला पतंजली योग समिती व जायंटस् सहेली ग्रुप तसेच युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यावतीने आयोजित जागतीक महिला दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम
शेगांव महिला पतंजली योग समिती व जायंटस् सहेली ग्रुप तसेच युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यावतीने आयोजित जागतीक महिला दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम
शेगांव:प्रतिनिधी: महिला पतंजली योग समिती व जायंटस् सहेली ग्रुप तसेच युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यावतीने आयोजित जागतीक महिला दिनानिमित्त सांस्कृतीक कार्यक्रम जागर महिला शक्तीचा८ मार्च रोजी शेगावच्या तहसीलदार शिल्पा बोबडे व नगराध्यक्ष शकुंतला बुच यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
मथुरा योग कक्षात मोठ्या प्रमाणात महिलावर्गाचा उपस्थित पार पडला
या प्रसंगी शेगाव शहरातील महिला भगिनींचा सत्कारही करण्यात आला
स्त्रीयांचे हक व अधिकारासाठी ११२ वर्षापूर्वी स्त्रीयांनी जो लढा दिला त्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. संतनगरीच्या महिला भगिनींना खूले व्यासपिठ मिळावे या उद्देशाने शेगांव नगरीत प्रथमच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिलांना पुरुषांबरोबरीचे स्थान, स्वसंरक्षणाचे धडे मिळावे व समान संधी मिळावी महिलांचे सक्षमीकरण व्हावे, प्रोत्साहन मिळावे, महिला शक्तीचा आदर, मातृत्वाचा सन्मान व्हावा या मूळ उद्देशाने महिलाशक्तीने विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. शिल्पा बोबडे (तहसिलदार)तर उघाटकद् सौ. शकुंतलाताईबुचनगराध्यक्ष)प्रमुख अतिथी:सौ. भारतीताई शेंडे, सौ. राजकुमारीताई भट्टड, सौ. माधुरीताई देशमुख सौ. सुनिताताई चांडक (महिला पतंजली योग समिती जिल्हाध्यक्षा)
यामध्ये विशेष आकर्षण मुलींचा सर्वागिण विकास व्हावा यासाठी खास एकलव्य धर्नुविद्या अॅकॅडमी यांचा सायकल मल्लखांब व रोप मल्लखांब यांचे नेत्रदिपक प्रात्यक्षिक स्व.बी.एस. देशमुख स्कुलचे मुलांनी शिक्षिका कालीदी लावण्या असंबे यांच्या चमुने उपस्थिताचे डोळ्याचे पारणे फेडणारे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले याप्रसंगी शेगाव शहरातील विशेष कामगिरी करणाऱ्या महिला भगिनींना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये शेगाव शहरातून आरोग्य व समाजोपयोगी कार्यांमध्ये अग्रेसर असलेल्या डॉक्टरां सौ अजुषा भुतळा निर्भया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ कल्पना मसने
बुलढाणा जिल्ह्यातील प्रथम महिला वकील सौ भाग्यश्री तळणीकर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सौ राधिका देशपांडे व विधवा महिलांसाठी सामाजिक कार्य मध्ये हळदी कुंकाच्या कार्यक्रमाचे आयोजन व विशेष योगदानाबद्दल सौ सुनीता कलोरे सामाजिक कार्यामध्ये सौ वर्षा इंगळे राष्ट्रीय योग स्पर्धेमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त केल्याबद्दल निधी विनायक भारंबे एरोबिक्स एशियाड स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल जुई तराळे.
साहित्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल सौ अश्विनी घुले जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष यांनी सामाजिक योगदानाबद्दल विशेष कार्य केल्याबद्दल सौ पद्मिनी पिंपळे साहित्य व नवोदित कवी म्हणून सौ वर्षा तायडे
तसेच शेगाव शहरांमधील आपल्या जिद्द चिकाटी व मेहनतीच्या बळावर शेतामध्ये कष्ट करून शेती टिकवली व आता त्या शेतामध्ये मथुरा लाॅन चे भव्य निर्मिती होउन समाजोपयोगी कार्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून मोफत योगवर्ग व एरोबिक्स करिता भव्य असे हाॅल चे सुसज्ज वास्तू उपलब्ध करून दिल्याबद्दल सौ मथुरा भानुदास भारंबे वय ६५यांचा विशेष सत्कार शेगाव संत नगरीचे नगराध्यक्ष व तहसीलदार यांच्या हस्ते करण्यात आला या नेत्रदीपक सोहळ्यास
महिला पुरुषांनी ची उपस्थिती मोठ्याप्रमाणात होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
सौ. वर्षा सरप (तालुकाध्यक्ष)
सौ. वृषाली भारंबे (अध्यक्षा, जायंटस् सहेली) सौ. लावण्या असंबे (युवा विकास बहुउद्देशिय संस्था अमरावती)
सौ. वर्षा तायडे यांच्यासह पतंजली योग समिती जेन्ट्स हेली व युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले कार्यक्रमांमध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याचा लाभ उपस्थितांनी घेतला या कार्यक्रमाचे बहारदार संचालन वर्षाताई तायडे वीणाताई लाखे यांनी केले व आभार प्रदर्शन सौ पद्मिनी पिंपळे यांनी केले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा