Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
1)
लागलाय बळी कामाला
पिकांना जोम आला
उधाण आलं मनाला
त्यात का रं तु अवतरला...
2)
उन्हाळा सुरु झाला
त्यात अवकाळी आला
हवेत गारवा निर्मिला
मनाला चटके देऊन गेला...
3)
चाललं होतं सुरळीत
यंदा मिळेल सुख
मनात होतं शेतकर्त्यांच्या
अवकाळीने दाखवले दुःख...
4)
काय सांगु राजा
वाटलं होईल मजा
कोणत्या कर्मची सजा
दाखवला पुन्हा दरिद्री दरवाजा...
5)
वाटलं यंदा घास
मिळेल सुखाचा आस
अवकाळी पाचवीला ताटास
बसेल सावकारी फास....
6)
जीव होतो वेडापिसा
संसार हा असा
उतरेना कर्ज डोंगर
अवकाळी मुळे जसाच्या तसा...
7)
नको कुणाचे उपकार
कुठं फेडू भार
यंदा आशा होती
पळवली अवकाळीने पार...
8)
सरकारी धोरण शेतकऱ्याच मरण
होतं अवकाळी नित्याचं आगमन
कसं मुलांचं लग्नाचं तोरण
दुरावस्था पाहुन रोजचं मरण...
9)
भीक नको हक्काचं हवं
मालाला दाम हवा पुर्ण
जे पिकलं सोनं आमचं
अवकाळीत पण लग्न करू घरनं...
10)
दुनियाच ज्याची खाते पोळी
त्याच्या जीवनाची नको होळी
अवकाळी नको बरसू अवेळी
सुखाची भाकरी मिळूदे थोडी....
11)
उच्चं शेती मध्यम व्यापार
कनिष्ठ होती नोकरी
वासे उलट फिरली
वाट अवकाळीत मरणाची धरली....
12 )
कितीही उलट फेर येवो
बांधवांच्या मनगटात धीर येवो
कित्तेक अवकाळी पचवले
उत्पन्न मालाला किंमत येवो....
13)
पुर्वी राज्याला जाण
शेतकऱ्यांना मिळे मान
कुणाला नाही आता जाण
अवेळी पावसानं पडतोय ताण...
14)
पावसा वेळीच गोडी
आहोत आम्ही भोळी
हिरावते तोंडातुन शिदोरी
बाप होतात वेडी....
15)
दिवस होते तुझे
तेव्हा खुप बरस
नाही आता गरज
नको अवेळी त्रास...
16)
आता नाही फास
पाडु धान्याची रास
हाच घेऊ ध्यास
मुलं पाठवु शिकण्यास....
प्रदिप मनोहर पाटिल
मु. पोस्ट गणपूर ता चोपडा
जिल्हा जळगाव
मो. 9922239055
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा