Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२०

झाडी येथील वृद्धाला शिवाजीने दिला अग्निडाग ; तर पिता पुत्राने व पोलीस पाटील यांनी दिला खांदा-



चार खांदेकरी ,एक मडके धरी बाबा चालले देवा घरी..........आयुष्यात 

अमळनेर झाडी प्रतिनिधी:कोणता काळ आणि वेळ केव्हा येईल हे कधीच सांगता येणार नाही. माणसाच्या जीवनात सूख आणि दुःख अनपेक्षित पणे केव्हा येईल सांगता येत नाही.अशीच घटना या अमळनेर तालुक्यातील झाडी येथे घडली.येथील जगन पितांबर मिस्तरी (वय- 65 ) यांचे आज ता.25 रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. 

सध्यस्थीतीत सर्वत्र देशाच्या काना कोपऱ्यात कोरोना आजाराने थैमान घातल्याने,कोरोना  विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशाचे अंमलबजावणी सर्वत्र होत आहे.यामुळे मयत जगन मिस्तरी यांचे दोघे मुले यात थोरला संतोष मिस्तरी, लहान सुकदेव मिस्तरी सुरत येथे कामाला आहेत.

त्यांना आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी सुरतहुन झाडी येथे ताबडतोब येणे शक्य नसल्याने झाडी येथील लोकन्युजचे संपादक श्री.संभाजी सुकलाल देवरे यांनी अमळनेर येथून अंत्यसंस्काराचे साहित्य आणीत त्यांचे मोठे बंधू यांनी  या बाबांना यावेळी खांदेकरी होऊन अग्निडाग दिला तर संभाजी देवरे,त्यांचे वडील सुकलाल काळू देवरे व पोलीस पाटील प्रवीण धनगर यांनी खांदा देत गावातील मोजक्याच लोकांनी उपस्थिती देत अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत म्हातारा हे दोघे पतीपत्नी  मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत  होते. कोरोना आजारामुळे कुणीही इकडे तिकडे येऊ शकत नसल्याने वडिलांच्या शेवटच्या क्षणाला मुले येऊ न शकल्याने त्यांच्या आईला व मुलांना हे दुःख मनाला हेलावणारे होते.मात्र आजही माणुसकी जिवंत आहे.याचेच उदाहरण झाडी ग्रामस्थानी दाखवीत.लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे आणि त्यांचे बंधू शिवाजी देवरे यांनी खरोखर  मानवता हाच खरा धर्म याला जोपासत गावातील वृध्द म्हाताऱ्याला शेवटच्या क्षणी पाणी आणि अग्निडाग देऊन हा महाराष्ट्र खरोखर राजे छत्रपती शिवाजी महाराज व राजे छत्रपती संभाजी महाराज यांचा संस्काराचा आहे. याचा आजही आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. 
    
दरम्यान मयत जगन मिस्तरी यांचे दोघे मुले व त्यांचा परिवार सुरत येथे असल्याने त्यांना ग्रामपंचायतीच्या लेखी पत्र देऊन गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना आणण्यासाठी सोय केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध