Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना चाचणी किटमध्ये शिरपूरचा सहभाग


शिरपूर प्रतिनिधी:जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणुच्या चाचणीसाठी लागणारे किट पुणे येथील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन ली.या कंपनीने अवघ्या सहा आठवड्यात तयार केले असुन विशेष म्हणजे या कंपनीचे संचालक राहुल पाटील हे शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील मुळ रहिवासी आहेत.सध्या असे किट जर्मनीहुन मागवले जात आहे.

भारतातील हे पहिलेवहिले किट आहे.'मायलॅब पॅथोडिक्टेट कोव्हीड-19 क्वालिटेटिव्ह पीसीआर कीट' असे या किटचे नाव आहे.

भारत सरकारच्या अन्न व औषध प्रशासनाची या किटला मान्यता मिळाली आहे.केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचीही या किटला मंजुरी मिळाली आहे.
यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या पाठिंब्याने व जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार पुर्णतः भारतीय बनावटीचे किट तयार करण्यात यश आले आहे.
सध्या भारतात कोरोनाची चाचणी कमी प्रमाणात होते आहे.

दहा लाख लोकसंख्येपैकी केवळ सात रुग्णांची चाचणी होते.इतर देशांमध्ये हे प्रमाण जास्त आहे.केंद्र सरकारकडुन सध्या या किट जर्मनीहुन मागवल्या जातात.किटसाठी इतर देशांवर अवलंबून राहणे त्रासदायक आहे.सध्या विमानसेवा बंद असल्याने यावर खूप फरक पडला आहे.त्यामुळे भारतात निर्मिती होणारी किट वापरणे उपयुक्त ठरणार आहे.मायलॅब एका आठवड्यात एक लाख किट तयार करणार आहे.एका किटच्या माध्यमातून 100 रुग्णांची चाचणी करता येऊ शकते.

सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर किट विकसित करण्यात आलेले यश महत्त्वाचे मानले जात आहे.आयसीएमआरमध्ये या किटच्या यशस्वीतेची चाचणी करण्यात आली आहे.

कोरोनासारख्या जागतिक संकटात शिरपूरचा सुपुत्र मोलाची मदत करत आहे याबद्दल तालुक्यातुन अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध