Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ मार्च, २०२०

लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत मी देशाची माफी मागतो : पंतप्रधान मोदी



मुंबई:प्रतिनिधी: कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. मात्र या कठोर निर्णयासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. 

अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घ्यावा लागला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचे नियम पाळून तुम्ही इतरांची मदत करत आहात असे नाही. 

तर लॉकडाउन पाळून तुम्ही स्वतःचीच मदत करत आहात हे लक्षात ठेवा. बाहेर पडून कुणालाही करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी आम्ही ही काळजी घेत आहोत. जे लॉकडाउनचे नियम मोडतील त्यांना पश्चात्तापच होईल असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. 

करोनाशी लढाई करायची असेल तर लॉकडाउनसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. करोना व्हायरससोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. जगभरात करोनामुळे मृतांची संख्या वाढली आहे. हा नक्कीच चिंतेचा विषय असल्याचं मोदींनी सांगितलं आहे. दरम्यान, अनेक लोक माझ्यावर नाराज असतील, मी असा कसा निर्णय घेतला? हे असे कसे पंतप्रधान आहेत? असंही अनेकांना वाटलं असेल. मात्र कठोर निर्णयांशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असंही मोदींनी म्हटलं आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध