Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ मार्च, २०२०
समाज न्याय्य हक्कासाठी, समाज प्रबोधनासाठी चलो अकोला, चलो अकोला
अकोला प्रतिनिधी:आपल्या समाजावर वेळोवेळी अन्याय अत्याचार होतांना दिसतो आहे मग ती समाजात उपासमारी असो, शारीरिक,आर्थिक,शैक्षणिक,राजकीय किंवा आरक्षण पातळीवर आपल्याला कमी लेखल्यासारखेच असो या सर्व मार्गातुन वाट काढायची असेल तर नितिमत्तेने योग्य मार्ग दाखवणारे असे बरीच कार्यकर्ते आहेत.
समाज म्हटलं तर अडचणी ह्या येत असतात जर आपल्याला वाटत असेल आपला समाज पुढे जावा तर आपण आपली मते मांडा पण तुम्ही मांडत नाही तुम्हाला भिती वाटते पण आता हि भिती दूर करायची आहे. जेव्हा ही भिती दूर होईल तेव्हा समाजाचा विकास होईल.
भोई समाजाचा विकास करायचा असेल तर प्रत्येकाने समाजा सोबत लढायला शिकलेच पाहिजे. आतापर्यंत आपला समाज भरकटत होता पण आता ह्या भरकटलेल्या समाजाला पुढे नेण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही समाजाला पुढे नेण्याचा विचार करत आहात तर तुम्ही आजचे भोई समाजाचे नायक आहात. जर समाजाला पुढे न्यायचे असेल तर, तरूण वर्गाचा सिंहांचा वाटा असायलाच पाहिजे.
तर मग विचार कसला करताय, चलो अकोला चलो अकोला सोमवार दि.०२/०३/२०२० दुपारी एक वाजता शासकीय विश्रामगृह बस स्थानकाजवळ अकोला. यावेळी उमेशभाऊ नंदाने आत्मारामजी माञे बंडुभाऊ सुरजुसे नंदुभाऊ धारपवार अशी बरीच मंडळी समाजप्रबोधन करण्यासाठी येत आहेत. तरी आपण एक समाज म्हणून यावेळी उपस्थित रहावे ही अपेक्षा
!ऊठ भोईराजा जागा हो! !! एकतेचा धागा हो !!
दादाराव किसनराव माहोरे
!! चलो एकता की और!! जय भोईराज
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा