Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

धुळे शहरात लॉकडाऊन कालावधीत दुचाकी वाहन वापरावर बंदी धुळे शहर पोलीस ठाण्या कडुन एकुण ९० मोटार सायकल वाहनांवर केसेस




धुळे -प्रतिनिधी कोव्हीड-19 कोरोना विषाणू लॉकडाऊन कालावधीत दुचाकी वाहन वापरावर बंदी घालण्यात आली होती यापुढे सर्व नागरीकांनी आपल्या विभागात दुध, भाजीपाला, किराणा व इतर जिवनाश्यक वस्तू खरेदी करावे, व खरेदी करण्यास जाणेकरीता पायी जावे असे पोलीस प्रशासनातर्फे अवाहन करण्यात आले होते 

यापुढे कोणीही नागरीक शहरातुन दुचाकी वाहनांवर अनावश्यक फिरतांना मिळून आल्यास पोलीस प्रशासनातर्फे सदरचे वाहन जप्त करून वाहनांवरील सर्व व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार होते 

या अनुषंगाने धुळे जिल्हयात संचारबंदी आदेश दिलेले असतांना, धुळे शहर पोलीस ठाणे हद्दीत विना कारण गर्दी करुन,  फेरफटका मारताना व अत्यावश्यक सेवा नसतांना दुकान उघडे ठेवणे, अश्या प्रकारे संचारबंदीचे आदेश न पाळणाऱ्या लोकांवर भादंविक.१८८ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून धुळे शहर पोलीस ठाण्या कडुन एकुण ९० मोटार सायकल वाहनांवर केसेस करुन, आज दि.३१/०३/२०२० रोजी २१ मोटार सायकली व १ चारचाकी वाहन ताब्यात घेतले असून. 

सदरची कारवाई मा.जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.चिन्मय पंडीत सो.यांचे आदेशान्वये मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.राजु भुजबळ व विभागीय पोलीस अधिकारी श्री.सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.हेमंत पाटील, सपोनि. श्रीकांत पाटील,सपोनि. दादा साहेब पाटील, प्रोमपोउनि . विजया पवार मॅडम, ASI हिरालाल बैरागी, नाना आखाडे, पोहेकॉ. भिका पाटील,पोहेकॉ. अब्बास शेख, पोना. मुक्तार मंन्सुरी, सतिश कोठावदे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदिप पाटील, कमलेश सुर्यवंशी, पकंज खैरमोडे,अविनाश कराड, तुषार मोरे, राहुल पाटील, राहुल गिरी यांनी सदर कार्यवाही केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध