Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

राज्यातील ११ हजार आरोपींना पॅरोलवर सोडण्याचे गृहमंत्री देशमुख यांचे आदेश...


कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी ११ हजार आरोपी आणि गुन्हेगारांची तातडीने पॅरोलवर सुटका करण्यात येणार आहे. तशा सूचना, आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी संबंधित प्रशासनांना दिले आहेत.

७ वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरुंगातील जवळजवळ ११ हजारआरोपी आणि गुन्हेगारांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आठवडाभरात त्यावर तत्परतेने कार्यवाही व्हावी, अशाही सूचना दिल्या गेल्या आहेत,अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध