Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

गहू, हरबरा,मका कांदा.पिकासह भाजीपाला पिकांचीही नासाडी : हजारोे हेक्टरवरील शेतपीक उद्ध्वस्त; शेतकऱ्यांनी करावे काय ?


उंटावद वार्ताहर गुरवारी सायंकाळी 6 ते 7च्या सुमारास शिरपूर तालुक्यातील  त-हाडीसह परिसरातील वरूळ,भटाणे, जवखेडा लोढरे ममाणे अभानपुर,वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. 

अनेक भागातील शेतात गारांचा खच पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हाताशी आलेल्या रबी पिकांना जोरदार फटका बसला. भाजीपाला पीकही उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांची लाखोंची हानी झाली आहे.

परिसरातील शेकडो हेक्टरमधील शेतपिकांची नासाडी झाली. यात गहू, हरभरा, मिरची, मका कांदे व भाजीपाल्यांचा समावेश आहे. शेतीच्या नुकसानीने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. गुरुवारीव अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले व विजेच्या कडकडासासह वादळी पाऊस व गारपीट झाली. 

तब्बल अर्धा तास गारपीट झाल्याने शेतपिक जमीनदोस्त झाले. आदी गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे भयंकर नुकसान झाले. गहू, ज्वारी, मिरची पीक जमीनीवर लोटून गेले तर उभ्या झाडावरील मिरची तुटून खाली जमा झाली. वादळामुळे अनेक घराचे छपरे उडून गेले, कच्चे मकान व झोपड्या ढासळल्या. अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर गाराचा खच जमा झाला.  अनेक शेतातील बाभळी, निम, आंब्याचे झाडे कोसळले. शेतातील पिकही क्षणार्धात डोळ्यादेखत गारीपीटाच्या तडाख्याने भूईसपाट झाले. हवामानाचा अंदाज अचानक बदलल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची सावरासावर करण्याआधीच शेतात होत्याचे नव्हते झाले. 

अकाली आलेल्या वादळी पाऊस व गारपीटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढविण्याने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर ही नगदी पिके क्षणार्थात जमिनदोस्त झाली. शेतकऱ्यांनी उसनवारी करुन मोठ्या मेहनतीने पिकांची लागवड केली होती. गहू, हरभरा, ज्वारी, मका कापणीला आली असताना गारपीटाच्या तडाख्याने भूईसपाट झाली. मिरचीच्या झाडाला एकही मिरची शिल्लक राहीली नाही. शेतात पिकांचा पार सडा पडला होता. भूईसपाट झालेला शेतमाल पुन्हा हातात येईल याची कोणतीच शक्यता नाही. एवढा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.
........ 
खरिपामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ही नुकसानभरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यातच पुन्हा वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 

यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. या नुकसानग्रस्त पिकांचे ताबडतोब कृषी विभाग व महसूल मंडळाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची नितांत गरज आहे. 

   - जिल्हा परिषद सदस्य

यावर्षी गावरान आंब्याचा मोहोर अत्यल्प प्रमाणात आला. ज्या काही आंब्याच्या बागांमध्ये मोहोर बहरला होता तोही या बेमोसमी पावसामुळे गळून पडला आहे. यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. 
 
- आंबा बागायतदार त-हाडी




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध