Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
भोई समाजातील तरुणांनो, तुम्ही समाजक्रांतीचे माझे आशास्थान आहात.... श्री अर्जुनभोई
भोई समाजातील तरुणांनो, तुम्ही समाजक्रांतीचे माझे आशास्थान आहात.... श्री अर्जुनभोई
भोई समाजातील तरुणांनो, तुमच्यासाठी लेखन करतो की, समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली...
तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि
"समुद्र चोर आहे".
त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा भोई-कोळी खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि
"समुद्र माझा पालन कर्ता आहे"
एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते
"समुद्र खुनी आहे".
एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर लिहीतो
"समुद्र दाता है".
अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते
लोकं काही म्हणू द्या... परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो.... आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो
तरुणांनो,
जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे तुम्हाला सकारात्मक करायचे आहे ते आपल्या पद्धतीने करायचे... भूतकाळातील काही बाबींचा विचार करत बसू नये यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात आपले मन विचलित होऊ देऊ नये.
जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता.
जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात. तरी उठा आणि तुम्हांला जे सकारात्मक तेही आपल्या समाजासाठी आपल्या लेकरांसाठी करावयाचे आहे ते सदसद्विवेकी बुध्दीने करा. पुनश्च जय भोईसमाज
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा