Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
मराठा समाजातील दोघा बहिणींनी कुस्ती स्पर्धेत मिळवला मान; मराठा समाजातर्फे सन्मान रोख स्वरूपात मदतही
मराठा समाजातील दोघा बहिणींनी कुस्ती स्पर्धेत मिळवला मान; मराठा समाजातर्फे सन्मान रोख स्वरूपात मदतही
शिंदखेडा( प्रतिनिधी) घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची वडील कृषी उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करतात त्यामुळे मजुरी त्यांना आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवावा लागतो त्यातल्यात्यात वडिलोपार्जित शेती उत्पन्न अल्प असल्याने दोघाही जन्मास घातलेल्या मुलींना यशाच्या शिखरावर नेऊन काबाडकष्ट करणाऱ्या मूळचे एरंडोल येथील रहिवासी अनिल पंडित मराठे यांच्या मुलींची ही कहाणी आहे
आई वडिलांचे स्वप्न पूर्ण
करण्यासाठी राज्यभरात नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर कुस्ती स्पर्धेसाठी आता महिला महिला पैलवान म्हणून योगेश्वरी मराठेची निवड झाली आहे तर दुसरी बहीण प्रेरणा हिला देखील राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेत 15 फेब्रुवारी रोजी कुस्ती स्पर्धेत यश मिळाल्याने मराठा समाजास या कुटुंबाच्या आनंद द्विगुणित झाला आहे
दरम्यान समाजासाठीही अभिनंदन व गौरवाची बाब असून त्यांच्या या कामगिरीची दखल घेत शिंदखेडा येथील अखिल भारतीय मराठा समाजाचे माजी संचालक व पत्रकार विनायक पवार यांच्यासह अखिल भारतीय संचालक चिंतामण बाजीराव पाटील पाचोरा एरंडोल येथील संचालक मनोज मराठे शिवसेनेचे चोपडा शहर प्रमुख जगदीश मराठे शिंदखेडा येथील प्रवीण जयदेव मराठी संतोष मराठे शिरपूर आदींनी एरंडोल येथे नुकतेच यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला रोख स्वरूपात बक्षीस दिली यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या हुरूप
वाढला आहे तथापि एरंडोल येथील समाजातील पहिल्या महिला तलाठी पदावर सुवर्णा केशवराव काळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या देखील या निमित्ताने सत्कार करण्यात आला एरंडोल येथील महिला बांधवांच्या यशामुळे समाजाच्या नावलौकिक वाढला आहे अशी प्रतिक्रिया सत्कार प्रसंगी विनायक पवार यांनी दिली
महिला पैलवान योगेश्वरी अनिल मराठे तिची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी 2 मार्च ते 6 मार्च दरम्यान हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले असून योगेश्वरी ला प्रशिक्षक भानुदास आरखे तसेच तिचे वडील अनिल पंडित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले आहे योगेश्वरी व प्रेरणा ही गुरु हनुमान कुस्ती गिर या एरंडोल स्थित संस्थेची खेळाडू असून अखिल भारतीय मराठा समाजात त्यांच्या या कुस्ती स्पर्धेत यशामुळे त्यांच्या नावलौकिक वाढलाय समाजाने त्यांना आर्थिक मदत करावी अशीदेखील मागणी करण्यात आली आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी/ प्रतिनिधी :- दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आय सि ए आय ) द्वारे घेण्यात आलेल्या 'सीए फाय...
-
जिवा भावाची मैत्री' या सामाजिक उपक्रमांतर्गत सुरगाणा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष उप पोलीस निरीक्षक मनोज कुव...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा