Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२०
रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण गाव सील
जळगाव प्रतिनिधी: जळगाव शहरातील मेहरूण परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णावर नाचणखेडा येथील डॉक्टरांनी उपचार केले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने रुग्णाच्या संपर्कातील त्याची जामनेर येथील बहीण व उपचार करणाऱ्या डॉक्टरला उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर प्रशासनाने खबरदारी म्हणून नाचणखेडा गाव सील केले आहे.
या रुग्णावर उपचार केल्यानंतर नाचणखेडा येथे आल्यानंतर डॉक्टरांनी गावातील रुग्णांची तपासणी केली व कुटुंबासोबत वेळ घालवण्याची माहिती समोर येत आहे. या डॉक्टरची गावात तीन घरे आहे. कुटुंबात 25 सदस्य असावेत. त्यांच्या घराच्या परिसरातील इतरांना जाण्यापासून रोखले आहे. या डॉक्टरला तातडीने तपासणीसाठी जळगाव शासकीय रुग्णालयात आला याची माहिती आहे. त्यांच्याशी संपर्क आलेल्या नागरिकांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. या डॉक्टरचे वडील, पत्नी सुद्धा डॉक्टर आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डी. एच.पातोंडे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. समाधान वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. संदीप पाटील, डॉ. विजय जाधव, डॉ. जितेंद्र पाटील, वाय.पी. कोकाटे, आर. बी. जाधव यांनी नाचणखेडे गावात भेट दिली. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली.
बहीण काही दिवसापासून भावाकडे
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णाची बहीण गेल्या काही दिवसापासून भावाकडे होती. तिचे सासरे जामनेरचे आहे. रविवारी रात्री ती मुलासह येथे आली. ही माहिती पोलिसांना कळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, डॉ. हर्षल चांदा यांनी भेट दिली. महिला व तिचा पती, चार मुलांची तपासणी करून त्यांना लगेच शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा