Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३१ मार्च, २०२०
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील नागरिकांना मदतीचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी:जळगाव ; शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालय येथे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ५१ नागरिकांना प्रशासनाने थांबविले आहे.मानवता धर्म या नात्याने त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करणे जळगावकरांचे कर्तव्य आहे.
आणि हे कर्तव्य जळगाव शहरातील दात्यांच्या मदतीने आपण पार पाडूया. या ठिकाणी थांबविण्यात आलेल्या नागरिकांकरिता १०० बेडशीट, जेवण, नाश्ता,चहा ची व्यवस्था पुढील लॉक डाऊन पर्यंत करायची आहे. आम्ही आपणास जळगांव कर या नात्याने विनंती करत आहोत की सदर नागरिक हे उत्तराखंड, मुंबई, विदर्भ येथील नागरिक आहेत.त्यांना मदत करायची आहे.त्यासाठी आपली एक मदत खूप महत्वाची असणार आहे.
मदत ही वस्तू स्वरुपात राधाकृष्ण मंगल कार्यालयात आज किंवा उद्या 31 मार्च पावेतो केल्यास ह्या नागरिकांची अडचण दूर होईल.
तरी आपण सढळ हाताने मदत करावी, ही नम्र विनंती.
– संपर्क –
योगेश नन्नवरे
मंडळ अधिकारी जळगाव शहर
महसूल विभाग,जळगांव जिल्हा
७८७५००४७४७
९८५००४२३८२
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा