Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मार्च, २०२०
शिवसेनेच्या वतीने बंदोबस्तावरील पोलीसांच्या जेवणाची केली व्यवस्था
अहमदपूर प्रतिनिधी गजानन आनंतवाळ
कोरोना व्हायरस संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने बाजारपेठा, शाळा, महाविद्यालय, कार्यालय, वाहतूक व्यवस्था बंद केली असून संचारबंदी आदेश लागू केल्यामूळे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना जेवन तसेच पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड झाले आहे.
सविस्तर माहिती अशी की, कोरोना व्हायरसला रोकण्यासाठी शासनाला संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या संचारबंदी काळामध्ये पोलीस मात्र शहराच्या ठिकठिकाणी ठरवून दिलेल्या ठिकाणावर आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांना जेवन तसेच पाणी वेळेवर मिळत नसल्यामूळे पोलीस कर्मचाऱ्यांचे बेहाल होत आहे.याची दखल घेऊन अहमदपूर शिवसेनेच्या वतीने शिवसेना
उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शहरातील ठरवून दिलेल्या ठिकाणावर ४० पोलीस कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. त्यामूळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. यावेळी व्यंकट नलवाड, शहरप्रमुख भारत सांगवीकर, बाळू मद्देवाड, अजित सांगवीकर, प्रदिप वट्टमवार यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा