Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

खिर्डी ग्रामपंचायत ने केली टीसीएल पावडर फवारणी. खिर्डी ता रावेर



रावेर प्रतिनिधी:तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो तो आपापल्या परिने काळजी घेत आहे. खिर्डी बुद्रुक गावात निर्जंतुकीकरण करण्यात आलं.व  टीसीएल पावडरची फवारणी करण्यात आली. सध्या कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव राज्यात पाहायला मिळत आहे. 

गावांमध्ये कोणताही कोरोनाचा परिणाम होऊ नये यासाठी खिर्डी येथील मंडळाधिकारी मिना तडवी,तलाठी फिरोज खान,लोकनियुक्त सरपंच किरण कोळी,ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन,गावातील माजी पोलीस पाटील  अरुण पाटील,ग्रामपंचायत सदस्य पंकज राणे,किरण नेमाडे, आशावर्कर यांच्यावतीने करण्यात आली. यावेळी संपूर्ण गावात, गटारी, घरे, बसस्टँण्डस फवारण्यात आले. 


तसेच गावात दूध,
मेडिकल,किराणा,भाजीपाला सारख्या अत्यावश्यक सेवा दुकानासमोर शिस्तबद्ध पद्धतीने 1 मीटरच्या अंतरावर चुना टाकून ग्राहकांना रांगेत वस्तू देण्याचे सूचना देण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध