Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ४ मार्च, २०२०
ऐनपूर महाविद्यालयाची एक दिवसीय सहल उत्साहात संपंन्न
प्रतिनिधी रावेर:निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथून जवळच ऐनपूर येथिल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने एक दिवसीय शैक्षणिक सहलीचे आयोजन जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे केले होते या सहलीमध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला वर्गातील विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
इतिहास विभाग प्रमुख प्रा.के.एल.हेरोळे यांनी सहलीचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी अजिंठा लेणी ला भेट देऊन मनसोक्त आनंद अनुभवला लेण्यांची सखोल माहीती देत लेणी संदर्भात इतिहासात नमुद असलेल्या बांबिंचे चित्रण विद्यार्थ्यांना समजून प्रा.के.एल.हेरोळे यांनी विद्यार्थ्यांना माहीती दिली. प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.पुजा कुमावत यांनी सहकार्य केले. सहलीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी.अंजने यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटोत:- अजिंठा लेणीची माहीती देतांना प्रा.के.एल.हेरोळे, प्रा.दिलीप सोनवणे, प्रा.वैशाली पाटील, प्रा.पुजा कुमावत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी:- धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मो...
-
वृत्तसंकलन विभाग नाशिक वणी पोलीस स्टेशन च्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असून काजिमाळा, धरमबर्डा, भनवड, देवसाना, करंजखेड,, कापाच...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा