Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ मार्च, २०२०

बुलडाणा जिल्हयातील ब-याच बेपत्ता मुली शोधण्यात पोलिसांना यश - गृहमंत्री देशमुख



अधिवेशनात तारांकित प्रश्नांस उत्तर
प्रतिनिधी:बुलडाणा जिल्ह्यात सन 2018 मध्ये 458 प्रकरणात 462 तर 2019 मध्ये 557 प्रकरणात 561 मुली व महिला हरवल्या आहेत. यामध्ये 2019 मधील 463 पैकी 380 महिला व मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित शोध न लागलेल्या 83 महिला व मुलींचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे.अनेक प्रकरणातील तपासात बेपत्ता झालेल्या मुली मर्जीने घर सोडून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणात गुन्हेगारी प्रवृत्तीतून मुलींना पळवल्याची बाब स्पष्ट झाली असल्याची माहितीही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

आ.श्वेता महाले

जिल्ह्यात 18 ते 25 वयोगटातील 1000 मुली व युवती बेपत्ता झाल्या आहेत. या गंभीर बाबीकडे दि. 2 मार्च रोजी आ. श्वेता महाले यांनी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधण्यासह कारवाई संदर्भात विचारणा केली होती*
या प्रश्नाच्या उत्तरादाखल देशमुख यांनी उपरोक्त माहिती दिली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध