Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२०

श्रीराम मक्रो व्हिजन अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेत रचला इतिहास






रावेर प्रतिनिधी:श्रीराम मॅक्रो व्हिजन अॅकेडमी रावेर या सी.बी.एस.ई. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भारतीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. 

हि यशप्राप्ती जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी व शाळेसाठी गौरवाची बाब आहे. शाळा वेळोवेळी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी, त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा विकास व्हावा हेच ध्येय समोर ठेवून वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असते. 

आणि अशा शैक्षणिक उपक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील सदैव प्रयत्नशील असतात ते नवनवीन उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीसाठी शाळेला अत्याधुनिक शैक्षणिक साधनांनी सुसज्य केली आहे. विद्यार्थ्यांनी स्वप्रतीभा ओळखावी यासाठी भारतीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली होती व त्या शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.


संपूर्ण भारतातून विज्ञान विषयाच्या प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ६वी चा विद्यार्थी विवेक संदीप पाटील हा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्याला एक लाखाचे शिष्यवृत्ती बक्षीसही मिळाले. चौथ्या क्रमांकाने इयत्ता ३ री ची विद्यार्थिनी श्रद्धा हेमंत बाविस्कर हि आली तिला टॅबलेट बक्षीस मिळाले, महाराष्ट्रात दुसरा इयत्ता ५ वी चा विद्यार्थी चैतन्य कुंदन नारखेडे आला त्याला शिष्यवृत्ती बक्षीस २००० रु. मिळाले. तसेच महाराष्ट्रातून पहिलीचा विद्यार्थी अंश जितेंद्र पाटील गणित विषयात २५ वा आला त्याला उत्कृष्ट पदक पुरस्काराने सन्मानीत करण्यात येईल, श्रीमय चेतन पाटील संगणक विषयात 3 रा व शिष्यवृत्ती १२०० रु.सानिका संदीप महाजन चित्रकला विषयात २४ वी. उकृष्ट पदक प्राप्त, इयत्ता २ रीचे विद्यार्थिनी अनुष्का रवींद्र संसारे संगणक विषयात २ री उत्कृष्ट पदक प्राप्त, जीविका ललित चौधरी चित्रकलेत २२ वी उत्कृष्ट पदक प्राप्त, इयत्ता 3 रीचे विद्यार्थी रोमित डी. महाजन गणित २१ वा उत्कृष्ट पदक प्राप्त, निशांत एस. पाटील १८ वा संगणक विषयात  उत्कृष्ट पदक प्राप्त, इयत्ता ४ थी यश आर. महाजन चित्रकलेत ४ थी यश आर. महाजन चित्रकलेत ४ था १००० रु. बक्षीस कुवर के. तायडे संगणक विषयात ६ वा ७०० रु बक्षीस, इय्यता ५ वी वैष्णवी पी. पाटील संगणक विषयात ११ वी उत्कृष्ट पदक, इयत्ता ९ वी दर्शिका आर. महाजन समाजाशात्र विषयात ७ वी ७०० रु. बक्षीस, शिवम एस. चौधरी विज्ञान विषयात १३ वा उत्कृष्ट पदक प्राप्त, भूमिका भारादवाज सामान्यज्ञान विषयात १३ वी उत्कृष्ट पदक प्राप्त . दिव्या ए. महाजन चित्रकलेत २० वी उत्कृष्ट पदक, इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी पूजा एम. चौधरी विज्ञान विषयात ५ वी १००० रु.शिष्यवृत्ती बक्षीस मिळाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्रीराम पाटील यांनी कौतुक करत अभिनंदन केले.


सर्व विद्यार्थ्यांनी शाळाबाह्य कोणतेही शिकवणी वर्ग न लावता शाळेतील वर्षभर स्मार्ट क्लासवर सराव केला तसेच शिक्षकांनीही वेळोवेळी मार्गदर्शन करून त्यांच्या कडून प्रश्नपत्रिका वर्षभर सोडवून घेतल्या विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम घेतले. विवेक पाटील, श्रद्धा बाविस्कर, चैतन्य नारखेडे यांची व्हिडीओ कॉन्फरन्स मुलाखत घेण्यात आली.


भारतीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षेसाठीचे अर्ज हे ऑगष्ट  महिन्यात भरले जात असून पहिली परीक्षा नोव्हेंबर मध्ये होते या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची दुसरी फेरी परीक्षा जानेवारी या महिन्यात होते, सर्व यश प्राप्त विद्यार्थ्यांना वर्षभर वेळोवेळी प्रशासक किरण दुबे, प्राचार्या सौ.कविता शर्मा शिक्षकवृंद यांनी मार्गदर्शन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध