Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ मार्च, २०२०

रावेर -येथील राजे छत्रपती शिवाजी चौकात दरवर्षाप्रमाणे यंदाही तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.


रावेर:प्रतिनिधी:येथील राजे छत्रपती शिवाजी चौकात दरवर्षाप्रमाणे यंदाही तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बुधवारी काल्याचे कीर्तन व महाप्रसाद, दिंडी, भारूळाने सांगता करण्यात आली.

सप्ताहात तुकाराम गाथा पारायण वाचक ह.भ.प. एकनाथ महाराज मांजरोद व ह.भ.प. बळीराम मामा यांनी केले. 

सप्ताहभर हरीपाठ, हरीकीर्तन यात ह.भ.प. संतोष महाराज, शिवाजी महाराज भामरे, दुर्गादास महाराज, ज्ञानेश्वर महाराज, विलास महाराज, महेश महाराज, प्रतिभाताई केळगावकर, व गोपाळ महाराज विवरे यांचे काल्याचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. 

बुधवारी दुपारी गाथापारायण सांगता, आरती होवून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी संत तुकाराम गाथा, पालखीतून संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गावरून भजनी मंडळासह मिरवणूक काढण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध