Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

रावेर खा.रक्षा खडसे यांनी एक कोटी रुपयांची मदत सरकारकडे जमा केली



जळगाव:प्रतिनिधी: रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी कोरोना या संसर्गजन्य आजारासाठी एक कोटी रुपयांची मदत सरकारकडे जमा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. या काळात नागरिकाच्या सोयी सुविधासाठी केंद्र सरकार तसेच देशातील राज्य सरकारांनी करोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे.

यादरम्यान, देशातील मोठ्या व्यक्ती देखील शक्य ती मदत करताना दिसत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एक कोटीची मदत सरकारकडे जमा केल्याचे खासदार रक्षा खडसे यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध