Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३१ मार्च, २०२०

पोलीस पाटील , सरपंचाचा मेडिकल किट विनाच कोरोना प्रतिबंधचा लढा



अशी प्रतिक्रिया गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे बुलढाणा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र भामद्रे  यांनी वेक्त केली.

संपूर्ण देशामध्ये व राज्यामध्ये कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना सुरू असून त्यामध्ये प्रत्यक्ष ग्राऊंड लेवल ला काम करणारे ,पोलीस पाटील आणि सरपंच यांना कोणत्या प्रकारचे मेडिकल किट आलेले नाही. त्यामुळे ते मात्र कोरोनाशि मेडिकल साहित्य तसेच इतर संरक्षणाशिवाय लढा देत आहेत. 

त्यामुळे त्यांना आरोग्य विषयक किमान मास्क,सेनेटायझर, हात मौजे,अशा प्राथमीक सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी उपस्थित होत आहे.कोरोना या जीवघेण्या विषाणूचा प्रसार थांबविणे करिता पोलीस ,पोलीस पाटील तसेच सरपंच हे दिवस- रात्र लोकांना गर्दी करण्यापासून रोखत आहेत. कोरोना विषयी जनजागृती करत आहेत.

सध्या जगात  संपुर्ण मानवजातीवर  घोंगावत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस पाटलांवर महत्त्वाची भूमिका सोपविली आहे. पुणे, मुंबई, सुरत ओरंगाबाद ,परदेशातून व इतर ठिकाणाहून गावात येणाऱ्या व्यक्तीची माहिती संकलित करणे, त्याचा दैनंदिन अहवाल सादर करणे, त्यांना आरोग्य तपासणी करून घेण्यास प्रवृत करणे, वेळ प्रसंगी त्यांना स्वतःहून तपासणी साठी घेऊन जाणे, त्यांच्या हातावर  शिक्के मारणे,  त्यांचे समुपदेशन करुन   त्यांना 14 दिवस घरा बाहेर पडू नये, असे बाहेरून येणाऱ्याना सांगण्यात आले.

सध्या देशात लागु असलेल्या कलम 144 ची अमलबजावणी आणि  या बाहेरुन आलेल्या लोकांची माहिती संकल व इतर कामानिमीत्त या बाहेरुन आलेल्या  लोकांशी ग्रामस्तरावर  सर्वात प्रथम पोलीस पाटील आणि सरपंच यांचाच प्रत्यक्षपणे संपर्क येत असल्याने सरपंच पोलीस पाटील यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

कोरोना या महाभयंकर विषाणू ची  आपल्या गावात लागण होऊ नये यासाठी पोलीस पाटील सरपंच त्यांच्या परिवाराची,  स्वतःच्या जिवाची पर्वा न करता लढा देत आहेत,  परंतु अशा या जीवघेण्या आजारापासून लढण्याकरिता त्यांच्याजवळ मात्र कोणत्याही प्रकारची मेडिकल किट संरक्षण यंत्रणा शासनामार्फत पुरविण्यात आलेली नाही. तरीही सरपंच व पोलीस पाटील व पोलीस हे आपले काम चोख पार पाडत आहेत. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. गावात गर्दी होवू न देणे व गर्दी झालेल्या ठिकाणी जावून ती गर्दी हटवून कोरोना बद्दल जनजागृती करणे हे काम ते चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत.
 तरीही  शासनाने जिल्ह्यातिल सर्व  पोलीस पाटील सरपंच यांना मेडिकल किट उपलब्ध करून द्यावी.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध